Editorial

हो ! आता आम्ही आहोत…  

‘Chinha Art News’ हे ऑनलाईन न्यूज पोर्टल आजपासून सुरु होत आहे. याआधी तीन वेळा आम्ही अशा स्वरूपाचं संकेतस्थळ सुरु केलं होतं. त्या त्या काळात तो प्रयत्न परिपूर्ण होता. पण आजच्या इतकं तंत्रज्ञान तेव्हा प्रगत नव्हतं असं म्हणा किंवा आम्ही कुठंतरी कमी पडलो असं म्हणात्या प्रयत्नातलं सातत्य आम्हाला राखता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. अर्थात शिळ्या कढीला ऊत आणण्यात आता काहीच मतलब नाही 

पण आता मात्र आम्ही संपूर्ण तयारीनिशी उतरलो आहोत. जगभरातल्या अन्य कुठल्याही चित्रकलाविषयक संकेतस्थळात उपलब्ध नाहीत अशा स्वरूपाच्या असंख्य गोष्टी घेऊन आता आम्ही आलो आहोत ! आमचा हा दावा तुम्ही देखील माहितीच्या आंतरजालात पडताळून पाहू शकता. उदाहरणार्थ इथं आम्ही शनिवाररविवार वगळता दररोजच एक विशेष लेख प्रकाशित करणार आहोत. चित्रकलाविषयक बातम्या तर सततच देणार आहोत. कव्हर स्टोरीज, हार्ड स्टोरीज, सॉफ्ट स्टोरीज या तर सातत्यानं आम्ही देणार आहोत. जेणेकरून केवळ मुंबईमहाराष्ट्राच्याच नव्हे संपूर्ण भारताच्याच चित्रकला क्षेत्रात काय घडते आहे याचे ज्ञान वाचकांना होणार आहे. आमच्या मते ‘Chinha Art News’चं हे वैशिष्ट्य अन्य कुठल्याही संकेतस्थळात असेल असं आम्हाला वाटत नाही 

आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातली कलादालनं, संग्रहालयं, कलासंस्था, कलाशिक्षण संस्था इत्यादी चित्रकलाविषयक सर्व माहितीसोबतच आम्ही भारतातल्या विविध शहरातल्या कलादालनांमधली प्रदर्शनं यांचं दर्शन देखील कला रसिकांना याच पोर्टलवरून सातत्यानं घडवणार आहोत. ‘Chinha Art Newsया आर्ट पोर्टलची ही सारी वैशिष्ठ्ये अभिनव ठरतील याची आम्हाला खात्री आहे

आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातली कलादालनं, संग्रहालयं, कलासंस्था, कलाशिक्षण संस्था इत्यादी चित्रकलाविषयक माहितीसोबतच आम्ही भारतातल्या विविध शहरातल्या कलादालनांमधल्या प्रदर्शनाचं दर्शन देखील कला रसिकांना सातत्यानं घडवणार आहोत. ‘Chinha Art News’ या आर्ट पोर्टलची ही सारी वैशिष्ठ्ये केवळ अभिनवच ठरणार नाहीत तर ती कलावंतांना आणि भारतीय कलेला देखील पुढे नेणारी ठरतील याची आम्हाला खात्री आहे.

या निमित्तानं एक गोष्ट आम्ही जाहीर करू इच्छितो ती ही की‘Chinha Art News’ हे पोर्टल चित्रकलेच्या क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचाच परामर्श घेणार आहे. त्यात अर्थातच चित्रकला शिक्षण हा विषय देखील आलाच. ‘चिन्हच्या यु ट्युब चॅनेलवरूनकलाशिक्षण महाचर्चेचे जाहीर कार्यक्रम सादर करून आम्ही हा ज्वलंत विषय कशापद्धतीने हाताळणार आहोत याची झलक दाखवून दिलेलीच आहे. साहजिकच कलाशिक्षण क्षेत्राचा परामर्श घेत असताना आम्ही आता कुणाचीच गय करणार नाही. आतापर्यंत झाकली मूठ सव्वा लाखाची होती, पण इथून पुढं मात्र ती परिस्थिती तशीच राहणार नाही याची देखील नोंद संबंधितांनी घ्यावी हे बरे. तूर्त इतकेच

चिन्हच्या सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा ! इथून पुढं असाच संवाद साधत राहू. धन्यवाद !

: संपादक 

 

Related Posts

1 of 4

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.