No products in the cart.
चित्रकार आर.बी.होले यांचा आणखीन एक मोठा गौरव !
अमूर्त चित्रकार राजाराम होले यांना चित्रकलेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा ‘नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड’ आणि जेबीआर हॉर्वर्ड अमेरिका मान्यताप्राप्त व केम्ब्रिज डिस्टेन्स स्कूल ऑफ एज्युकेशन यू के संलग्न सेंट मदर तेरेसा युनिव्हर्सिटी यांच्याकडून ‘पेंटिंग आर्ट अँड कल्चर ‘ प्रवर्गातील मानद डॉक्टरेट पदवीनं गौरवण्यात आलं आहे. त्यांना हा पुरस्कार व पदवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू डॉ. प्रल्हादभाई दामोदर मोदी व काश्मीरचे महाराजा हरि सिंग यांची वंशज संध्या गुप्ता यांच्या हस्ते २८ एप्रिल रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार इथं प्रदान करण्यात आले आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून संयुक्त अरब अमिरात सत्ताधारी कुटूंबातील सदस्य मा. शेख माजीद राशीद अल मौल्ला, राज्यसभा सदस्य तथा कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे महाराज होते.
‘चिन्ह’च्या ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमात श्री आर.बी. होले हे सहभागी झाले होते. त्यांच्या या अनौपचारिक गप्पा मोठ्या प्रमाणावर पाहिल्या गेल्या. सदर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/watch?v=tVBr-EhnaOo&t=3208s
Related
What's your reaction?
Related Posts
Please login to join discussion