News

रंगा’त भोईर यांच्या ऐवजी गावंड !

सह्याद्री दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या ‘रंगा येई वो’ या साप्ताहिक कार्यक्रमात आज सायंकाळी ०५.३० वाजता चित्रकार विनायक भोईर यांची मुलाखत होणार होती, पण काही तांत्रिक अडचणींवर हा कार्यक्रम रद्द झाल्याचे कळते. त्या जागी आता ज्यांनी भारतीय नाण्यांवर खूप काम केलं आणि मास्टरी मिळवली असे चित्रकार वसंत गावंड यांची मुलाखत पुनर्प्रसारित केली जाणार आहे. आपण रोज नाणी हाताळतो, पण ती कशी केली जातात ? डिझाईन कशी केली जातात ? त्याची मॉडेल्स कशी बनवली जातात ? प्रत्यक्षात आपल्या हातात पडणारं नाणं कसं तयार होतं ? या संदर्भात आपण अनभिज्ञ असतो. चित्रकार वसंत गावंड जे मुंबईच्या टांकसाळीत अधिकारी होते, त्यांच्याकडूनच यासंदर्भात आपल्याला पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. आज सायंकाळी ५ वाजता आणि रात्री ०२.३० वाजता तसेच रविवार दि. २४ एप्रिल रोजी दुपारी ०२.०० आणि रात्री ०८.३० वाजता हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे, नक्की पहा !

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.