News

‘रंगा’मध्ये विनायक भोईर !

शनिवार दि. ७ मे २०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता ‘रंगा येई वो’ या सह्याद्री वाहिनीच्या चित्रकारांवरील कार्यक्रमात नवी मुंबईचे चित्रकार विनायक भोईर यांच्यावरील कार्यक्रम सादर होणार आहे. विनायक भोईर हे मुंबईच्या जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे विद्यार्थी, अंतिम वर्षाला असताना त्यांनी सुवर्णपदक देखील पटकावलं होतं. आधी उल्का आणि नंतर कॉन्ट्रॅक्ट ऍडव्हर्टायझिंगमधून अनुक्रमे व्हिज्युअलाईझर / इलस्ट्रेटर, आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं. ७४ साली त्यांना ‘कॅग अवॉर्ड’ देखील मिळालं होतं. २००६ साली ‘नवी मुंबई भूषण’ या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. हाच कार्यक्रम रविवार दि. ८ मे रोजी दुपारी ०२.०० आणि रात्री ०८.३० वाजता देखील प्रसारित केला जाणार आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 7