News

बसोलीच्या कार्यशाळा सुरु !

कोरोना लॉकडाऊननंतर बसोली ग्रुपनं आपली वर्कशॉप्स नव्या जोमानं सुरु केली आहेत. मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी म्हणजे १४ मे रोजी नागपूरच्या पं. बच्छराज व्यास विद्यालयात मातकाम प्रात्यक्षिक आणि मुलांसाठीची कार्यशाळा आयोजित केली आहे. संपूर्ण दिवसभर म्हणजे सकाळी ०८.३० पासून सायंकाळी ६ पर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेसाठी प्रत्येक प्रवेशार्थीकडून ५०० रुपये इतकी फी आकारली जाणार आहे. ६ ते १५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच या कार्यशाळेत प्रवेश दिला जाणार आहे. कार्यशाळेसाठी लागणारं सर्व कलासाहित्य तसेच नाश्ता, जेवण, आईस्क्रीम इत्यादी सर्व संयोजकांतर्फे पुरवले जाणार आहे. सातारच्या मंदार लोहार या १४ वर्षाच्या शिल्पकाराकडून मातीकामाचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९८२३१ ५९८९७ या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव ८ मेपूर्वी रजिस्टर करावे. असे आवाहन बसोली ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.