News

मे महिन्यातल्या ‘गच्चीवरील गप्पा’ !

मे महिन्यातल्या ‘गच्चीवरील गप्पा’ ! ‘गच्चीवरील गप्पां’चे मे महिन्यात चार कार्यक्रम होणार आहेत. त्यातला पहिला कार्यक्रम आहे अजिंठा या पुस्तकाच्या लेखिका डॉ सौ. राधिका टिपरे यांच्याशी गप्पांचा. त्यांनी लिहिलेल्या सुमारे तीनशे पानाच्या अजिंठयावरच्या पुस्तकासंदर्भात  या गप्पा होणार आहेत.

हा कार्यक्रम होणार आहे सात मे रोजी तर १४ मे रोजी होणाऱ्या ‘गप्पां’मध्ये सहभागी होणार आहेत चित्रकार सुबोध गुरुजी. दादरच्या प्रख्यात समर्थ आर्टच्या तीन गुरुजी बंधुंपैकी ज्येष्ठ असलेले सुबोध गुरुजी हे उपयोजित कलेतल्या एका वेगळ्याच प्रवासाविषयी गप्पा मारणार आहेत. तर २१ मेच्या शनिवारी तरुण पिढीतला चळवळ्या कलावंत निखिल पुरोहित ‘गप्पां’मध्ये सहभागी होणार आहे. तर शेवटच्या शनिवारी म्हणजे २८ मे रोजी प्रख्यात चित्रकार अरुण कालवणकर हे आपल्या पॅरिसमधल्या स्टुडिओतुन ‘गच्चीवरील गप्पां’मध्ये सहभागी होणार आहेत. ‘गच्चीवरील गप्पां’चे आतापर्यंत ८१ भाग प्रसारित झाले असून हे सर्व भाग ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. आमच्या या चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका !

What's your reaction?

Related Posts

1 of 7