News

कृष्णमाचारी बोस यांचा मोठा सन्मान !

दिल्लीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘हॅलो इंडिया’ आयोजित कला पुरस्कार सोहळ्यात मूळचे केरळचे आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार कृष्णमाचारी बोस यांना नुकताच ‘२०२२ वर्षातले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन’ आणि ‘सर्वोत्कृष्ट क्युरेटर’ या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यांनी क्युरेट केलेल्या आणि कोची बिएनाले फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकेम ठरवडू’ शीर्षकाच्या प्रदर्शनासाठी हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

कृष्णमाचारी हे जेजेचे विद्यार्थी आहेत. त्यांनी जेजेमधून बीएफए आणि लंडन युनिव्हर्सिटीमधून एमएफए केलं. १९८५ साली त्यांना केरळ ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. तसंच मिड अमेरिका आर्ट्स अलायन्स अवॉर्ड, बोस पॅशिया प्राईझ फॉर मॉडर्न आर्ट, न्यूयॉर्क वगैरे अनेक पुरस्कार त्यांनी आजपर्यंत पटकावले आहेत.

What's your reaction?

Related Posts

1 of 7