News

नाशकात प्रथमच न्यूड पेंटिंग कार्यशाळा !

योनी स्टुडियो (आर्किटेक्ट इंटिरियर )तर्फे नाशिकमध्ये १४ आणि १५ मे या दिवशी प्रथमच न्यूड पेंटिंग कार्यशाळा १० ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि चित्रकलेची आवड असलेल्या पाच धाडसी मुलींनी न्यूड पेंटिंगचा भारतातील इतिहास लोकांना कळावा आणि याबद्दल जनजागृती व्हावी या हेतूनं याच वर्षी सुरु केलेल्या स्टुडियोतर्फे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

‘नाशिकमध्ये आजवर न्यूड पेंटिंग कार्यशाळा कुणीही आयोजित केली नव्हती. न्यूड पेंटिंगबाबत चित्रकलेच्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही पाच मुलींनी मिळून उभारलेली ही चळवळ आहे. न्यूड पेंटिंग का करतो ? काय आहे न्यूड पेंटिंग ? त्याचा इतिहास काय ? हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावा यासाठी याविषयी ऐतिहासिक माहितीसोबतच त्याचं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ही पहिलीच कार्यशाळा असूनही त्याला विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे’, असे मत योनी स्टुडियोच्या प्रज्ञा बैरागी यांनी ‘चिन्ह’कडे व्यक्त केले.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 9834792208 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन योनी स्टुडियोतर्फे करण्यात आले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 7