News

राज शिंगे पुस्तक प्रकाशन सोहळा !

सृजनसंवाद प्रकाशनतर्फे चित्रकार आणि लेखक राज वसंत शिंगे यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा शनिवार दि. १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यात सुभाष पथावरच्या जिल्हा परिषद कार्यालयाशेजारच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ‘काडी’ हा कवितासंग्रह, ‘सोरट’ हा ललितलेखसंग्रह, ‘शांतिनिकेतन’ आणि ‘झोरीचा आणि सर्बिया’ ही दोन प्रवासवर्णनं अशा मिळून एकाच लेखकाच्या चार पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सर्वश्री प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते, लेखक – दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अभिनेते अविनाश नारकर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या उमा नाबर यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत अभिनेत्री / ग्रंथपाल तपस्या नेवे.

What's your reaction?

Related Posts

1 of 7