News

ठाण्यात रविवर्मा स्मृतिदिन !

प्राच्य विद्या अभ्यास संस्था ( इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडी ) ठाणे या संस्थेतर्फे प्रख्यात भारतीय चित्रकार राजा रवीवर्मा यांच्या १७४ व्या जन्मदिनानिमित्तानं एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन संस्थेच्या हाजुरी येथील सभागृहात करण्यात आलं आहे. २९ एप्रिल या राजा रवीवर्मा यांच्या जन्मदिनाचे निमित्त साधून ७ मेपर्यंत म्हणजे तब्बल ९ दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राजा रवीवर्मा यांची चित्रे तर प्रदर्शित करण्यात आली आहेतच, पण त्याच बरोबर प्रात्यक्षिक, व्याख्यानं आणि चित्रकला कार्यशाळांचे आयोजन देखील करण्यात आलं आहे.

 

२९ एप्रिल रोजी या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून, ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत हे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. त्याच बरोबर विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. तर रविवार १ मे रोजी सायंकाळी ५ वाजता राजा रवीवर्मा यांच्या कार्याविषयी ग्रंथप्रेमी रवीप्रकाश कुलकर्णी हे भाषण देणार आहेत. २ मे, ३ मे, ४ मे, ५ मे आणि ६ मे या दिवशी अनुक्रमे नीलिमा कढे, श्रीपाद भालेराव, विजयराज बोधनकर आणि विलास बळेल ही मंडळी विविध विषयांवरच्या कार्यशाळा घेणार आहेत, तर शेवटच्या दिवशी म्हणजे ७ मे रोजी पत्रकार कला समीक्षक श्रीराम खाडिलकर हे राजा रवीवर्मा या विषयावर भाषण देणार आहेत. या कार्यक्रमाचे माहितीपत्रक सोबत जोडले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 7