News

‘चित्रपल्लव स्वरसमिधा’ खंडकाव्य प्रकाशन सोहळा !

साईनाथ फुसे लिखित ‘चित्रपल्लव स्वरसमिधा’ या खंडकाव्याचा प्रकाशन सोहळा नुकताच यशवंत कला महाविद्यालयाच्या कलादालनात फकिरराव फुसे, राजर्षी शाहू महाविद्यालय पाथ्री व सौ. सुमनबाई फुसे यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवयित्री प्रा. ललिता गादगे व प्रमुख वक्ते- डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रमुख अतिथी चंद्रकांत वानखेडे (जेष्ठ कवी) पुणे, दीपध्वज कोसोदे (प्रसिद्ध लेखक), गिरीश काळे (बासरी वादक) हे होते. या प्रसंगी साईनाथ फुसे यांनी कलादालनात त्यांची खंडकाव्यावरील चित्रं व इतर निसर्गचित्रं प्रदर्शित केली होती. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटक भरत गढरी (अधिव्याख्याता शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, नागपूर) व रवींद्र तोरवणे (प्राचार्य यशवंत कला महाविद्यालय) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे निवेदन मोहन बाभुळगांवकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन फकिरराव फुसे यांनी केले. या पुस्तकाचे प्रकाशन व आयोजन ‘संवाद प्रकाशन’, औरंगाबाद यांनी केले होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 7