News

‘झपुर्झा’ संग्रहालयाचं १९ मे रोजी उदघाटन !

रेणू आणि अजित गाडगीळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अभिनव अशा ‘झपुर्झा’ या संकल्पनेचं उदघाटन दि. १९ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. दीप प्रज्वलनानंतर तीन ते पाच या वेळात ऑडिटोरियममध्ये रेवा नातू यांचं गायन आणि शर्वरी जमेनीस यांचं नृत्य तर सहा ते आठ या वेळात अँफी थिएटरमध्ये आनंद भाटे यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. दि. १९ पासून २२ तारखेपर्यंत ‘झपुर्झा फेस्टिव्हल’मध्ये नाटक, काव्यवाचन, नाट्यवाचन, फ्युजन म्युजिक अशा असंख्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खडकवासल्याजवळ असलेल्या कुडजे व्हिलेजमध्ये हा अभिनव उपक्रम साकारतो आहे ज्यात भारतीय चित्रं, शिल्पं, हस्तकला, दागिने, सिरॅमिक, टेक्सटाईल इत्यादी कलांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सुनील पाठक 98509 91009 या नंबरवर संपर्क साधावा. 

What's your reaction?

Related Posts

1 of 7