No products in the cart.
- Home
- Uncategorized
- क्राफ्ट बाजारचे आयोजन
क्राफ्ट बाजारचे आयोजन
एनआयएफटी या शिक्षण संस्थेतर्फे दि 11 व 12 एप्रिल 2023 रोजी क्राफ्ट बाजारचे आयोजन करण्यात आले आहे. किशनचंद वालेचा हॉल, जुहू येथे हा क्राफ्ट बाजार आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात हातमाग आणि पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या वस्तू तयार करणाऱ्या कारीगरांशीही कला रसिकांना या मोहोत्सवांदरम्यान भेटता येणार आहे. NIFT क्राफ्ट बाजार 2023 मध्ये भारतातील हातमाग आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन केले जाईल. पैठणी, ब्लॉक प्रिंट टसर, खादी, बावन बुट्टी, बिद्री, चित्रकथी, लोकर, चामड्याचे उत्पादने, बंजारा दागिने, गोंड, शिबोरी, भुज्जोडी, सोलापूर यांसारख्या समृद्ध पारंपारिक कलाकुसरीची खरेदी कला रसिक करू शकतील. त्याचबरोबर वॉल हँगिंग्ज, हिमरू, डोकरा, ऍप्लिक, टेराकोटा, क्रोशेट, हुपरी, लेदर बाहुल्या, काचेच्या वस्तू , हँड एम्ब्रॉयडरी, माहेश्वरी, काश्मिरी कलाकुसर, अजरख, लाकडी दागिने, वारली, चिकनकारी, पट्टेडा अंचू, तंतू, जामदानी यासारख्या वस्तूही ग्राहकांना विकत घेता येतील.
या महोत्सवाची वेळ सकाळी 11:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी खालील पोस्टर पाहावे.
Related
Please login to join discussion