No products in the cart.
नग्नतेचे अवडंबर नाकारणारा समाज
देशभरातील कलाविश्वाचा धांडोळा घेण्यासाठी सायकलवरून भारत सफरीवर निघालेला प्रतीक जाधव आता दक्षिण भारताची सैर आटोपून ओडिशाला दाखल झाला. २ ऑगस्टला त्याच्या या कलाप्रवासाला दोन वर्षे पूर्ण झाली. ‘चिन्ह’ मध्ये याआधी देखील आपण त्याने देशाच्या विविध भागांतील लोकजीवन आणि कला अविष्कारांविषयी लिहिलेले ओघवते लेख वाचले आहे. आजच्या लेखात त्याने देशाच्या पूर्व भागात वसलेल्या ओडिशा या राज्यातील ग्रामीण भागातील नग्नतेचा बाऊ न करता सुखनैव नांदणाऱ्या समाजाविषयी नेहमीच्याच सहजतेने लिहिले आहे. या उमद्या तरुणाच्या ताज्या दमाच्या लेखणीतून आसेतूहिमाचल विविधतेने नटलेला आपला ‘भारत’ तुम्हाला नव्याने गवसेल.
***
प्रतीक जाधव
आज ओडिशामध्ये पहिला दिवस. आंध्रा आणि ओडिशाच्या बॉर्डरवर दुपारी चहासाठी टपरीवर थांबलो होतो. तिथे या स्थानिक बाई आल्या होत्या. इथल्या महिलांचे पारंपरिक दागिने भारी असतात. दोन्ही नासिका मध्ये चपट्या छोट्या तबकड्या असतात. आम्ही ‘फोटो काढू का?’ म्हणून विचारलं तर त्यांनी साफ नकार दिला. तेवढ्यात टपरीचा मालक मागून म्हणाला “काढा, काढा बिनधास्त काढा”
अनिता, जी माझ्यासोबत प्रवासात आहे तिने त्या दुकानदाराला विचारलं “या तुमच्या पत्नी आहेत का?”
दुकानदार म्हणाला…… “नाही, म्हणूनच म्हणालो काढा”!
ओडिशाच्या गावागावातून जाताना भारी मजा येतेय. मुद्दाम हायवे सोडून गावातले रस्ते पकडतोय. इथल्या गावांची वेगळी मांडणी आहे. मी जगन्नाथपुरीच्या आजूबाजूच्या गावांमधे फिरतोय. प्रत्येक गावात एक दोन गाव तलाव आहेत. त्याच्या काठावर सगळीकडून आत उतरायला पायऱ्या. स्त्रिया पुरुष त्यात अंघोळ करायत हे दृश्य नेहमीचच. इथला पुरुष वर्ग अंगावर खाली आखूड लुंगी आणि वर उघडा बंब. आयुष्यभर अंग मेहनत करून झालेले पिळदार स्नायू दिसतात. वयस्क लोकांचे पिळदार शरीर एखाद्या तरूणालाही लाजवेल असे. गावात कोणीच कमरेवरचे कपडे घालत नाही. पुरुषच काय, स्त्रिया सुध्दा बहुतांश ब्लाऊज नेसत नाहीत. स्तन झाकण्यापुरता पदर छातीवर फिरवतात. आणि काही वेळा तेही नाही. पण कोणी त्यांना त्यावरून टकमक बघतय असंही नाही. नाहीतर अन्य ठिकाणी स्त्रीयांच सर्वांग झाकलेलं असतानासुद्धा लोकं डोळे फाडून बघतात.
त्यामुळे नग्नतेविषयी फार बाऊ करणारा हा समाज आहे असं वाटत नाही. ह्यांच्या सर्वच मंदिरामध्ये नग्न , मैथुन शिल्पे आहेत. फक्त प्राचीन नाही तर नवीन मंदिरांवर सुध्दा नग्न चित्रे शिल्पे पाहून मलाही आश्चर्य वाटलं.
ओशाकोटी नावाच्या चित्रप्रकारात शक्तीला पुजले जाते. त्यात तर एवढ्या नग्न आणि चित्र विचित्र आकृत्या पुजल्या जातात की तेव्हा असं वाटतं की खरच धर्माच्या नावाने नग्नतेचा बाऊ करणारी लोकं, त्यांना धर्म कळलाय का? संस्कृती कळलीय का? कारण हे सगळं भारताचं अंतरंग पाहिल्यावर कोणात्याही मनात नग्नता असभ्य वाटणार नाही
या दोन ऑगस्टला कलाप्रवास सुरू करून तीन वर्षे पूर्ण झाली. त्या वेळी मागे वळून पाहिलं की केवढा भारत मी सायकलने फिरलो , तर मलाच अशक्य वाटलं जे मी अंतर पार केलय.
विशाखाट्टणम ते भुवनेश्वर ह्या प्रवासात मी एकटा नाही. मला या प्रवासात जे. जे. ची माजी विद्यार्थिनी अनिता राव सोबत आहे. वय ५४ असले तरी ती तेवढ्याच जोमाने सायकल चालवत आहे जेवढा की मी. या वयात तिची ऊर्जा आणि तिची सोबत अनोख्या प्रदेशात एक वेगळा अनुभव देणारी ठरत आहे. आमचा मित्र यादव वंजारे याने आम्हा दोघांचं सायकलवरचं हे अर्कचित्र करून पाठवलं तेव्हा खूप आनंद झाला होता. भुवनेश्वरहून अनिताला निरोप देताना तिचे डोळे पाणावले होते. ह्या थोड्या दिवसाच्या प्रवासात तीही माझ्यासोबत खूप काही नवीन शिकली होती. प्रवास असाच असतो प्रत्येक टप्प्यावर आपण लोकांना भेटतो आणि पुन्हा त्यांना मागे सोडून पुढे जाताना मन भरून येतं. प्रत्येक ठिकाणी आपण आपल्याला थोडं थोडं मागे सोडत जावं लागतं.
मैं एक यात्री हूँ
जो नरम बिस्तर छोडके
उत्तरमे कही थंडे पहाडोंमे जाता हूँ
ताकी खुद के सामर्थ्य को जान सकू I
मैं एक यात्री हूँ
जो धुप मे तप्त रेगिस्तान चल रहा हूँ
ताकी प्यास का अर्थ जान सकू l
मैं एक यात्री हूँ
जो नदी के साथ चलते सागर तक पहुंच जाता हूँ
और लहरोंकी भाषा धुंडता हूँ l
मैं एक यात्री हूँ
जो विशाल फैले हुए मैदानोंसे
घने जंगलोमे गुम हो जाता हूँ
ताकी खुद को धुंड सकू l
मैं एक यात्री हूँ
जो अजंता के रंगो मे बुद्ध हो पाता हूँ
और नीला असमान हो जाता हूँ l
मैं एक यात्री हूँ
जो खजुराहो के अप्सरा को जीवित पाता हूँ
ओर मंदिरोंमे कहानी धूंडता हूँ l
मैं एक वो यात्री हूँ
जो कही दुरदराज आदिवासी के घरों में
उनके चित्रोंमें जीवन का प्रतिबिंब देखता हूँ l
मैं एक वो यात्री हूँ
जो लोगो मे इंसान ओर
इंडिया मे भारत धुंडता हूँ
मैं एक यात्री हूँ l
******
प्रतिकचे आधीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएपवर लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art
लेख कसा वाटला ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन जरूर सांगा.
Related
Please login to join discussion