Features

कृष्णचित्रे

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! कृष्ण, या नावातच मोहिनी आहे. करोडो भारतीयांची इष्ट देवता, राधेचा प्रियकर, गौळणींचा सखा असलेल्या कृष्णाला भारतीयांच्या मनामनात स्थान आहे. अशा या लोकप्रिय देवतेला असंख्य कलाकारांनी आपल्या कुंचल्याने चितारले आहे. ही सर्व चित्रे १७ ते १८ व्या शतकातील आहेत. या काळात बहुतांशी कला ही राजाश्रयाच्या साहाय्यानेच समृद्ध झाली. मुघल, कांगडा शैलीतील ही चित्रे प्रपोर्शन, डिटेलिंग आणि सौन्दर्याचे उत्तम उदाहरण आहेत. उत्तमोत्तम असा हा कलासंग्रह मात्र आपल्या दुर्दैवाने परदेशी संग्रहालयांच्या ताब्यात आहे.  तेव्हा आपण तो फक्त फोटोतच बघू शकतो. समृद्ध अशा भारतीय कला परंपरेत चित्रित ही कृष्णचित्रे खास Chinha Art News च्या वाचकांसाठी. 

बागेमधील राधाकृष्ण (१८३०)

या चित्रात राधाकृष्ण बागेमध्ये निवांत बसले आहेत. दोघांचे हितगुज सुरू आहे. सेविका सुमधुर संगीत वाजवत आहेत. दासी सेवेसाठी तत्पर आहेत. अतिशय सुंदर आणि बारीकसारीक तपशीलांसहित चित्रित केलेली बाग बघून मन प्रसन्न होते. हे चित्र पहाडी चित्रशैलीतील असून सध्या ब्रिटिश म्युझियमच्या संग्रहात आहे. 

 गवळणींच्या  खोड्या काढणारा कृष्ण (१६१०)

भारतीय समाजाला नग्नतेचं कधीच वावडं नव्हतं. नग्नतेला अश्लील मानल जाऊ लागलं ते  व्हिक्टोरिअन काळापासून. त्याआधी आपला समाज लिबरल होता आणि म्हणूनच तर इथे आपण यमुनेत अंघोळ करणाऱ्या गवळणींचे कपडे चोरणारा कृष्ण बघतोय. झाडावर बसलेला कृष्ण, शेजारी फांदीला लटकवलेले कपडे, कपडे द्यावे म्हणून विनंती करणाऱ्या गवळणी आणि यमुनेचे प्रवाही पात्र एवढ्या साऱ्या गोष्टी या एकाच चित्रात चितारल्या आहेत. हे राजस्थानी पेंटिंग असून सध्या न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझियमच्या ताब्यात आहे. 

रुसलेली राधा, चिंतीत कृष्ण(१८२०३०)

राधाकृष्णाच्या नात्याचे अनेक पदर आहेत. राधा कृष्णाची वाट बघत आहे, पण कृष्णाला उशीर होतोय. या चित्रात कृष्ण भेटीसाठी उशीरा आला. राधा नाराज झाली आहे. कृष्ण उशीरा येण्याचे कारण सांगतोय पण राधेला काहीच ऐकायचे नाहीये. ती एका  हाताने कृष्णाला जवळ यायला नकार देतेय तर दुसऱ्या हाताने कान  झाकून घेतेय, तिला काही ऐकून घ्यायचे नाहीये कृष्णाचे. किती सुंदर चित्रण आहे हे! राधेचा नकार आणि कृष्णाचे खजील होणे सर्व काही या चित्रात आले आहे. 

हे चित्र कांगडा शैलीत असून सध्या ब्रुकलिन म्युझियमच्या संग्रहात आहे 

गवळणी आणि कृष्ण (१८ वे शतक)

गवळणींना कृष्णाची कशी भूल पडली होती ते आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. कृष्णाची सुमधुर बासरी सगळ्यांनाच आपल्या मधुर स्वरांची भूल पाडते. मग कामात गुंतलेल्या गवळणीच काय गायीसुद्धा मंत्रमुग्ध होऊन कृष्णाची बासरी ऐकत आहेत. सध्या हे चित्र क्लिव्हलँड म्युझिअममध्ये संग्रहित आहे. 

प्रियकर कृष्ण (१८ वे शतक)

कृष्ण आपल्या सगळ्यांचा देव. पण या चित्रात तो चक्क राधेचे पाय रंगवत आहे. प्रेमात आकंठ बुडालेले प्रियकर प्रेयसी म्हणजे राधाकृष्ण. मग दैवत्व विसरून आपल्या प्रेयसीचे लाड पुरवणारा हा कृष्ण बघून आपण थक्क होतो. शेजारची सेविकाही कृष्णाला हे काम करताना बघून आश्चर्यचकित होत आहे. कांगडा शैलीतील हे चित्र सध्या फ्रांन्सेस्का गॅलोवे आर्ट गॅलरीमध्ये पाहायला मिळेल. 

राधाकृष्णाची वन भेट (१७७०)

या चित्रात राधाकृष्ण वनात भेटत आहेत. डिटेलिंगवर या चित्रात खूप काम केले आहे. कृष्णाला भेटायला केवळ राधाच नाही तर गोप, गवळणी आणि गायीसुध्दा आतुर असतात. मोरही आपला पिसारा फुलवून कृष्ण भेटीचा आनंद घेत आहे.  मुघल शैलीतील हे चित्र सध्या क्लिव्हलँड म्युझियमच्या संग्रही आहे. 

झोपाळ्यावरील राधाकृष्ण (१७८०)

या चित्रात राधाकृष्ण झोपाळ्यावर बसले आहेत. वर मोकळे आकाश आहे. दासी सेवेसाठी तत्पर आहेत. झोपाळ्यावरचे डिटेलिंग किती सुंदर आहे ते बघा. डाव्या बाजूला दासी वाद्य वाजवत आहेत. मागे दाट फुलझाडी आहेत. गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण उठून दिसत आहे. राधाकृष्णाच्या बसण्याची जागा मध्यभागी असल्याने लक्ष त्यांच्याकडे केंद्रित होते. मुघल शैलीतील हे चित्र असून २०२१ मध्ये क्रिस्टीजने याचा लिलाव केला आहे. 

– कनक वाईकर, डोंबिवली.

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.