EditorialFeatures

मालवण शोकांतिका आणि आपण !

मालवणमध्ये झालेल्या पुतळ्याच्या शोकांतिकेसंदर्भात सतीश नाईक यांचा पहिला लेख प्रसिद्ध होताच अक्षरशः व्हायरल झाला. अवघ्या चार तासात तो ५० हजार वाचकांपर्यंत पोहोचला. त्यावर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणावर आल्या. ज्या प्रतिक्रिया आल्या त्याचं संकलन करायचं आम्ही ठरवलं आहे. कारण त्या प्रतिक्रिया अतिशय उत्स्फूर्त आहेत आणि बोलक्या देखील. हा लेख प्रसिद्ध झाल्याला आता तीन दिवस झालेत. या तीन दिवसात १,०६,२६१ वाचकांपर्यंत तो पोहोचला असल्याची नोंद फेसबुकवर झाली आहे. या लेखमालिकेत किमान चार तरी असे लेख प्रसिद्ध होतील, ते अर्थातच पुढच्या आठवड्यात. त्यावरच्या देखील प्रतिक्रिया कळवायला विसरू नका ! त्या सर्वांनाच आम्ही विशेष लेखाद्वारे स्थान देणार आहोत. दुसऱ्या लेखावरील प्रतिक्रिया येत्या सोमवारी वाचा…
१) Yogesh Kadam
आपटे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर वार कसला दाखवलाय?
२) Hiralal Raut
Yogesh Kadam कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी तलवारीने केलेला वार आहे तो.
३) अनंत मालाडकर
शिवराजेश्वर मंदिर किल्ल्यावर आहे त्यात महाराजांची सर्वात जुनी गाबताच्या वेषातील निःशस्त्र अशी मूर्ती आहे. मोदींनी तिचं दर्शन घेतलं असतं तरी खूप झालं असतं. उगाच हा पुतळा उभा राहायचा कार्यक्रम केला
४) Lonkar Mahesh
तुमचं बरोबर आहे,पण लोखंड कधीच तुटत नाही – वाकते,
खूपच जुने असेल तर तुटते
५) Nikhil Ghadigaonkar
राजे तुम्ही बांधलेले गडकिल्ले अजून स्वाभिमानाने उभे आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणत्याच राजकीय पक्षाला इच्छा नाही. तुमच्या पुतळ्यावरून राजकारण चालू आहे, पण गडकिल्ल्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही.
६) Yogesh Narvekar
मूर्ख माणूस आहे तो, जो माझ्या राजांचे असे फोटो शेयर करतोय… निर्लज्जम सदा सुखी म्हणतात ते उगीच नाही…
कधी कधी प्रश्न पडतो आम्हाला… या लोकांना महाराजांच्या घडवून आणलेल्या विटंबनेचा राग येतोय की आनंद वाटतोय ?
बंद करा रे… तुमच्या फालतू राजकारणामुळे तुम्ही तुमची जनतेच्या मनातली किंमत आणखीन कमी करून घेताय…
६) Vikram Tambvekar
खूप अभ्यासपूर्वक लिहिलेले आहे.
सत्य घटनाक्रम महाराष्ट्रातील जनतेला कळला पाहिजे. राजकीय हस्तक्षेप झाला आहे हे सत्य आहे.
खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि या पुढे पुतळे उभारणे बंद करावे असे नियम करावे. कारण थोर आणि महान व्यक्तींचा अपमान होणे योग्य नाही
जय महाराष्ट्र 🙏
७) Deepak Alave
एवढे माहिती होते तर दुर्घटना घडण्याच्या आधी लेख लिहायला पाहिजे होता,
Satish Naik’s Reply
@Deepak Alave समजा आपण तक्रार केली असती तर ही मंडळी आपलं ऐकून तरी घेणार होती का ? त्यांना तेवढा वेळ तरी असतो का ? आणि समजा त्यांनी अगदी ऐकून घेतलं असतं तर ते काय करणार होते ? वारा किती किलोमीटर वेगानं वाहतो हे तुम्ही वाचलं नाहीत का ? या साऱ्याचं मूळ कलाशिक्षणात आहे. गेली ४२ वर्ष मी त्यासंदर्भात लिहितो आहे, लढा देतो आहे. हा सारा लढा सरकारी यंत्रणेबरोबरच होता. आता आता कुठे त्याला यश मिळतं आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांची १६० पदं गेली ३०-४० वर्ष रिक्त आहेत, त्यामुळे हे सारं घडलं आहे. येत्या तीन लेखांमध्ये मी हे सारं विशद करून सांगणार आहे.
Deepak Alave’s Reply
@Satish Naik’s Malvan हया दुर्घटने मध्ये राजकारणी लोकांना काय फरक पडतो माहीत नाही
पण सर्व सामान्य शिवप्रेमी च्या भावना किती दुखावल्या आहेत ?
तुम्ही आधीच काही सोशल मीडियावर याबद्दल लेख लिहून जनआंदोलन उभे केलं असते तर आम्हीपण तुमच्या सोबत उभे राहिले असतें, आणि ही दुर्घटना घडलीच नसती
Satish Naik’s Reply
@Deepak Alave मी गेले ४०-४२ वर्ष सरकारच्या विरोधात फक्त आंदोलनच करत आलो आहे. अर्थात माझं माध्यम हे लेखन आहे. लेखनाद्वारेच मी सरकारशी लढा दिला. २००८ साली तब्बल अडीच-तीन लाख रुपये खर्च करून मी ‘कालाबाजार’ नावाचा अंक देखील काढला. हेतू हाच की १६० वर्षाचं जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कलाशिक्षणात सुधारणा व्हावी. इतक्या वर्षाच्या लढ्यानंतर गेल्या वर्षी जेजे स्कूल ऑफ आर्टला डिनोव्हो दर्जा मिळाला. आता जेजेचा प्रश्न मार्गी लागला. ४२ वर्ष हा काही कमी कालावधी नव्हे ! हे जर आधीच घडलं असतं तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी काही दुर्दशा झाली ती निश्चितपणे झाली नसती.
चार शब्द लिहिता येतात म्हणून फेसबुकवर एखाद्यावर टीका करणं किंवा अनाहूत सल्ला देणं सोपं असतं. आज माझं वय ६९ आहे. मी मुंबईत राहतो. घटना घडली मालवणात. तरीही जर तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत असाल तर यावर आणखीन काय बोलावं ?
८) प्रमोद राजू
आणि काय पुरावा हवा ? वैभव नाईकाचाच हात…. सरकार बदनाम करणे हीच नीच वृत्ती घटना घडवण्यासाठी कारणीभूत……
९) प्रमोद राजू
मुंबईत बारा बॉम्बस्फोट घडलेले असताना नकली तेरावा बॉम्बस्फोट घडवणारा कोणत्याही थराला जाऊ शकतो…… स्थानिक आमदार घटनेनंतर पंधरा मिनिटांत जागेवर असतो इथंच काहीतरी पाणी मुरतंय……
१०) Sunil Girkar
या निमित्ताने एक सिध्द झाले की जेजे सारख्या नामांकीत अग्रगण्य संस्थेत शिकणारे सर्वच विद्यार्थी परिपूर्ण नसतात !
Satish Naik’s Reply
@Sunil Girkar महाराष्ट्राच्या कलासंचालकाचा जिथं अनेक वर्ष पत्ता नाही, चार शासकीय कला महाविद्यालयांमध्ये अधिष्ठातांचा पत्ता नाही, जिथे अधिष्ठाता निवडले गेले आहेत तिथं त्यांच्या अकलेचाच पत्ता नाही, तिथं आणखीन काय लायकीचं शिक्षण तुम्हाला अपेक्षित आहे ? तुम्हाला ठाऊक आहे का आज जेजेतल्या शिक्षकांच्या १६८ पदांपैकी १६० पदं रिक्त आहेत. आता कुणाला दोष द्याल ? जेजेच्या वास्तूला की राज्यकर्त्यांना.
Sunil Girkar’s Reply
@Satish Naik’s Malvan मी सुद्धा कोकणचाच ! देवगड फणसगाव.
मी ही दोन शिल्प कल्याण महापालिकेसाठी बनवली आहेत !
११) Sunil Girkar
पुतळा तयार करणार्यांकडून पूर्वानुभवाचे दाखले , पुरावे तसेच बँक गॕरंटी ॲग्रीमेंट करुन घेतले होते काय? या कामाचे टेंडर काढण्यात आले होते काय ? जनतेच्या पैशांचे झालेले नुकसान वसूल करण्यात येणार काय ? की प्रकरण दाबले जाऊन जनताही नेहमीप्रमाणे सर्व विसरणार आहे !
१२) Vithoba Rane
छत्रपती शिवाजी महाराज की जय.
आपण हे आता सगळ्यांनी राजकीय पक्ष, अपक्ष, सत्ताधारी, मीडिया आणि आपण सर्व सामान्य जनता…या सर्वांनी हा विषय थांबवूया.. कारण पुतळा पडला, पुतळा पडला आणि तो खुद्द महाराजांचा ….हे ऐकताना माझ्यासारख्या असंख्य आजी माजी मराठा रेजिमेंट सैनिक,अधिकारी याना दुःख वाटते आणि मन घायाळ होतं…
नम्र विनंती की कुणीही या आमच्या मनोगतास राजकीय रंग देऊ नये..आम्ही सैनिक भारत भूमीचे आहोत कुणा एका पक्षाचे नाही. जय हिंद !
१३) Anil Athavale
या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण ? नौदल, केंद्र सरकार की राज्य सरकार ?. जो तो जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे.
१४) Ratan Phadatare
झालं ते झालं पण ते फोटो कशाला शेअर करता आणि एव्हढेच तुम्हला आधी कळलं होतं तर आधीच कलेक्टर किंवा CM यांना सांगायचं
Satish Naik’s Reply
त्या घटनेचे जे अतिशय आक्षेपार्ह फोटो होते ते काही आम्ही टाकलेले नाहीत. तेवढी समज आम्हाला वयोमानपरत्वे निश्चित आहे. माझं कुळ आणि मूळ मालवणचंच आहे. आमचे पूर्वज महाराजांच्या आरमारांवर होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात असा काही विचार करणं हे स्वप्नात देखील भयंकर ठरलं असतं. समजा त्यावर काही लिहिलं असतं तर त्यावर देखील प्रचंड गदारोळ झाला असता. पण माझ्या मार्च किंवा एप्रिल महिन्यातल्या पोस्ट पाहिल्या तिथल्या एकंदर कामाविषयी मी अगदी स्पष्ट शब्दात लिहिलं होतं.
तुमचा दुसरा प्रश्न की ‘कलेक्टर आणि सीएम यांना का नाही सांगितलं ?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, समजा आपण या मंडळींना सांगायला गेलो तर ते आपलं ऐकून तरी घेणार आहेत का ? त्यांना तेवढा वेळ तरी असतो का ? आणि समजा त्यांनी अगदी ऐकून घेतलं असतं तर ते काय करणार होते ? वारा किती किलोमीटर वेगानं वाहतो हे तुम्ही वाचलं नाहीत का ? या साऱ्याचं मूळ कलाशिक्षणात आहे. गेली ४२ वर्ष मी त्यासंदर्भात लिहितो आहे, लढा देतो आहे. हा सारा लढा सरकारी यंत्रणेबरोबरच होता. आता आता कुठे त्याला यश मिळतं आहे. जे जे स्कूल ऑफ आर्टसारख्या जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांची १६० पदं गेली ३०-४० वर्ष रिक्त आहेत, त्यामुळे हे सारं घडलं आहे. येत्या तीन लेखांमध्ये मी हे सारं विशद करून सांगणार आहे.
१५) Tatoba Desai
या लेखात सतीश नाईक यांनी काय नवीन सांगितले?
Satish Naik’s Reply
@Tatoba Desai खरंय तुमचं, पण कशी कुणास ठाऊक गेल्या २४ तासात ही पोस्ट ९० हजारापेक्षा जास्त फेसबुक मित्रांनी वाचली आहे. ( या प्रतिक्रिया पोस्ट करत असताना जवळजवळ तीन दिवस झाले आहेत. या तीन दिवसात सदर पोस्ट सव्वा लाखावर पोहोचली आहे.) कदाचित त्यांना तुमच्यापेक्षा काही वेगळं दिसलं असेल. ही केवळ प्रस्तावना होती. पुढचे लेख अवश्य वाचा !
१६) Bhagwat Patil
समृद्धी महामार्ग पण त्याच प्रकारचा आहे.
१७) Harshad Naik
खालील चौथऱ्याचं कंत्राट उबाठाच्या मालवणी मित्राकडे होतं. वैभव नाईकना विचारा सारे रामायण समजेल, नीचपणाचा कळस आहे.
१८) Shripad Modak
जगाच्या पाठीवर पुतळे, सर्व ठिकाणी उभारले जातात, हार, फुले घालून प्रसंगी त्यांची शोभा वाढविली जाते, ती आपल्या पराक्रमी योद्ध्यांची प्रतीकं असतात पण, कडक ऊन, पाऊस, हवा यापासून त्यांचं संरक्षण केलं जात नाही, पक्षी त्यावर बसून विष्ठा विसर्जन करतात, अशा प्रकारे त्या महात्म्यांची विटंबना अखंड चालू असते, हे एक प्रकारचं निंदनीय कृत्य घडतं आणि त्या प्रतिकांचा अपमानच होत असतो, आता राजकारणी लोकांना त्याचं राजकीय भांडवल करून मतांच्या पोळ्या भाजायला आयतं निमित्त घडलं हे वास्तव सर्वाना माहिती आहे,
कोणत्याही राजकीय पक्षाचा अभिनिवेश न बाळगता हे कटू पण सत्य वास्तव मांडलं आहे !
या वर कितीही टोकाची चांगली वाईट मतं व्यक्त झाली तरी वास्तव डोळ्याआड करता येणार नाही !
१९) Sagar Bhalekar
अजून किती नीचपणा करणार आहेत लोक ? याला क्षमा नाही… नालायक लोक आहेत 😡😡😡
२०) Vandana Naik
महाराज आम्हाला माफ करा 😪
२१) Sawant Vandana
वा ! खरी माहिती आणलीत लोकांसमोर, आता तरी डोळे उघडा, काय चाललंय राजकारण !
२२) Babu Ludbe
आमच्या किल्ले सिंधुदुर्गचं महत्त्व कमी करण्यासाठी हा सर्व अट्टाहास होता काही राजकारणी लोकांचा. जर एवढे शिवप्रेमी असते तर तो पुतळा शिवलंकेत उभारला असता किवा समोरील पद्मगडावर बसवला असता
२३) Ajay Pandurang Shinde
असो आता सर्व कवित्व काही उपयोगाचे नाही..हे सर्व स्वतःचा उदो उदो करण्यासाठी चालले आहे.त्यांना इतिहासात काही रस नाही. फक्त मार्केटिंग करायचे आहे.. कोकणातल्या लोकांनी ठरवून जोड्यानी हाणलं पाहिजे..
२४) Snehal Lata Kadam Gamre
सहमत,
२५) Shraddha Thumbre
त्यावेळीच आवाज उठवला असता तर बरं झालं असतं आता सगळे पोळ्या भाजतात ते टळलं असतं!
२६) Priyanka Parkar
अतिशय दुर्दैवी 😔
२७) Narayan Dhawde
राजकोटसारखा दुर्लक्षित किल्ला सरकार – नेव्हीने प्रकाश झोतात आणला त्याविषयी कौतुकच, पण पुतळ्या विषयी केलेली घाई नडली. किंबहुना मोठ्या पुतळ्याचा अट्टाहास का ? सुबक, नक्षीदार, थोडा लहान सिंहासनावर बसलेला पुतळा पण उत्तम झाला असता. सिंधुदुर्ग मध्ये असे अनेक किल्ले आहेत जे विस्मृतीत गेले आहे त्याकडे लक्ष दिल्यास उत्तम.
Babu Ludbe’s Reply
@Narayan Dhawde राजकोट हे एक नाव होत तिथ त्यामुळे राजकोट, सर्जेकोट ही नावे इतिहासात आढळत नाहीत, पण काही राजकारणी लोकांनी इतिहासाची तोडफोड करण्यासाठी त्या जागेची निवड केली. जर याचे छत्रपतींवर प्रेम आणि इतिहासाची योग्य सांगड घातली असती तर हाच पुतळा शिवकालीन पद्मगडावर किंवा मोरयाचा धोंडा येथे उभारला असता आणि खऱ्या अर्थाने किल्ल्याची शान वाढली असती.
२८) Satywan Mane
खूप वाईट गोष्ट आहे हे ज्या महाराजांनी आपला महाराष्ट्र स्वतःच्या हिंमतीवर असा बांधून ठेवला की तो महाराष्ट्र आज पण तटस्थ उभा आहे आणि त्या महाराजांची मूर्ती अशी ही हवेने ढासळावी हे कदापि सहन करणार नाही.
२९) Kanchan Bodke
महाराजांना मनात ठेवा असली निकृष्ट दर्जाची कामं करून अजून अपमान नका करू, आता केलात तेवढे पुरे आहे 😨
३०) Chandrashekhar Ramnavmiwale
सारेच भयानक आहे. एवढी प्रतारणा?
३१) Milind Ambarte
Simple example of all time corruption
३२) Santosh Pawar
अगदी बरोबर बोललास माझ्या भावा. 🙏
३३) Raju Kamat
जे महाराजांनी बनवलंय ते कायम राहणार आहे. त्यांचं अस्तित्व कधीच मिटू नाही शकत.
३४) Bhargav Rane
हा वैभव नाईक तोडफोड करतो, पण त्याच्याच माणसांनी मजूर योजनेतून काम मिळवलं आणि ही तोडफोड सुरु केली.
३५) मि मालवणकर
का कोण जाणे हा पुतळा महाराजांचा वाटतही नाही ! महाराजांचा पुतळा अश्वारूढच पाहिजे होता.
३६) Dipika Wakkar
मालवणमधील रहिवासी एवढे अलिप्त आहेत, भावनाशून्य आहेत की आपल्या दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर जो काही राजकारण्यांचा तमाशा चालला होता तो एकजुटीने येऊन कुणालाही तिथे येण्यास अटकाव करायचं सोडून मजा बघत बसले, आमका काय त्याचा ? ही घातक वृत्ती, तो विकृत जरांगे येऊन काय तपासणी करतो आणि काय बोलतो, त्याला मराठा बोलायची पण लाज वाटते आणि वाईट वाटते ते माझ्या मालवणकरांचे 😔
३७) Poonam Khairmode
नको आता महाराजांवर राजकारण. किती दिवस चालणार हे ? श्रद्धा कमी आणि बाजारीकरण जास्त. महाराज आपल्या मनात आहेत आणि असणार. पुतळ्याची गरज नाही. ऍटलीस्ट त्या खर्चातून रस्ता नीट केला तरी कोकण आनंदाने नाचेल.
३८) Ravi Godase
एकंदरीतच कला क्षेत्राचं फारसं कौतुक सध्याच्या राजवटींना नाही. केंद्रातही नाही, राज्यातही नाही.
कलाकार म्हणजे दोन चार घटका एन्टरटेन करणारे पोटार्थी जीव ! इतकाच साधा सोपा विषय झाला आहे. एका ठराविक सांस्कृतिक पठडीतून आलेलं उद्बोधक आणि संस्कृती संवर्धक छापाचं काही असलं तर कदाचित त्याची दखल होत असावी.
३९) Vijay Shinde
तुम्ही लोक जमिनी विकून बसलात आता काय ?
४०) Shashikant Patil
मालवण येथील महाराजांचा पुतळा हल्लीच पडला
पण
1. जेव्हा पदासाठी हिंदुत्ववादी पक्षाशी गद्दारी केली
2. जेव्हा निवडून येण्यासाठी मुस्लिम मतांचे लांगुलचालन झाले.
3. जेव्हा वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध झाला
4. जेव्हा नवाब मलिकांचा मातोश्रीवर सत्कार झाला.
5. जेव्हा हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबले.
त्या प्रत्येक वेळी तो पुतळा थोडा थोडा खचला पण कळलेच नाही.
😔😔😔
४१) Sachin Kapade
लाजमोडी सरकार
४२) Nandan Dhulap
सर खूप छान ! अगदी तपशीलवार माहिती. खरोखर राज्यकर्ते निर्लज्ज आहेत, अकलेचे तारे तोडून मोकळे झाले गृहमंत्री, तर मुख्यमंत्री बरळले खराब हवामान, खारी हवा वगैरे. बेशरम ! आजपर्यंत कितीतरी शिल्प दिमाखात उभी आहेत, स्वतःचे दोष लपविण्यासाठी मेलोड्रामा चालला आहे. एक तर एवढ्या घाईघाईत उदघाटन करण्यासाठी अहमिका लागली होती कारण खासदारकीच्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. सगळीकडे पैसे खाऊन काम करवून घ्यायची. एखाद्या फालतू कॉन्ट्रॅक्टर पकडायचा आणि उखळ पांढरे करायचे मग तो मुंबई गोवा हायवे असो की पुतळा.
४३) प्रमोद राजू
कहीं पे निगाहे,कहीं पे निशाना…… सरकारला सतत बदनाम करणारे एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात हे पटत नाही पण ज्याने मुंबईत बारा बॉम्बस्फोट घडलेले असताना सुद्धा तेरावा नकली बॉम्बस्फोट घडवला तो कोणत्याही थराला जाऊ शकतो हे सतत बिंबत गेल्याने खरे विरोधी राजकारण समजू लागले.
४४) Pratap Bhosale
सगळ्यात चीड येणारी गोष्ट म्हणजे नेते लोक मानभावीपणे माफी मागण्याचे नाटक करायला लागलेत. पण त्या आपटेला काम कोणी द्यायला लावले ते नेते, पुतळा उभारणीशी संबधित खाती व सरकारी अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करायला हवी. ते करेना झालेत आणि वर मुजोरपणे राजकारण करू नका असा दम द्यायला लागलेत.
अरे सामान्य जनता कशाला करेल.? ती स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर आली आहे व ती सर्व मुजोर व या प्रकरणाशी संबंधित नेत्यांना व पक्षांना गाळात नक्की घालणार. कारण माफी चुकीला असते, गुन्ह्याला नाही. व हा अक्षम्य असा गुन्हा आहे.
सतीश नाईक
sateesh.naik55@gmail.com
‘चिन्ह’च्या वेबसाईटवरील जयदीप आपटे यांचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

Related Posts

1 of 69

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.