Features

पिकासो आपला आपला

सप्टेंबर महिन्यात चित्रकार आणि माजी कलाध्यापक शिरीष मिठबावकर यांनी मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे ‘वर्ल्ड प्रीमिअर पिकासो एक्झिबिशन ‘ या प्रदर्शनाला भेट दिली. मिठबावकरांचा मुलगा ऑस्ट्रेलियात राहत असल्यामुळे हा योग जुळून आला. हे प्रदर्शन भव्य तर होतेच पण एकाच छताखाली पिकासोच्या अनेक कलाकृतींचा आस्वाद कला रसिकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून घेता आला. या प्रदर्शनाचा अनुभव आणि फोटो खास चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी शिरीष मिठबावकरांनी ऑस्ट्रेलियातून पाठवले आहेत जरूर वाचा.

‘वर्ल्ड प्रीमिअर पिकासो एक्झिबिशन’ नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ व्हिक्टोरिया, मेलबर्न येथे जून ते ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केले होते. या प्रदर्शनाला मी कुटुंबासोबत भेट दिली. हे प्रदर्शन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. पिकासोच्या अनेक कलाकृतींचा या प्रदर्शनात समावेश होताव. नॅशनल आर्ट गॅलरी ऑफ व्हिक्टोरिया दरवर्षी श्रेष्ठ चित्रकारांचे प्रदर्शन भरवते. यंदाचे वर्ष हे पिकासोच्या चित्रांसाठी होते. दरम्यान मीही ऑस्ट्रेलियात असल्यामुळे मला हे प्रदर्शन बघण्याचं भाग्य लाभले. प्रदर्शनाला तिकीट होते पण संपूर्ण कुटुंबासाठी ६५ डॉलर एवढे तिकीट असल्याने फार महाग वाटले नाही. लहान मुलांसाठी १० डॉलर एवढे तिकीट होते तर मोठ्यांसाठी ३० डॉलर. प्रदर्शन बघण्यासाठी रसिकांची चांगलीच गर्दी होती. लहान मुले, तरुणाई यांची लक्षणीय उपस्थिती हे तर भारताच्या अगदी उलटे चित्र होते. रसिकांची गर्दी बघून मी सुखावलो.खूप थंडी असून लोकांचा उत्साह दांडगा होता. तिकीटे ऑनलाईन घेऊनच सारे लोक येत होते . गॅलरीने उत्तम व्यवस्था राखली होती . सिक्युरीटी अतिशय कडक पण त्याकडे न पाहता सारे प्रदर्शनाचा आनंद घेत होते . प्रदर्शनात लोक शांतता पळत होते, आणि काही बोलायचेच झाले तर अगदी हलक्या आवाजात बोलत होते. मोबाईलमध्ये प्रत्येक जण संस्मरणीय अनोखे क्षण जपून ठेवत होता . इथे दिसलेले अजून एक चित्र म्हणजे आई – वडील मुलांना चित्र समजावून सांगत होते. मित्र- मैत्रीणी , त्याच प्रमाणे काही कलावंत आणि कला समीक्षक एकत्र चर्चा करत होते आणि मुद्दे लिहून घेत होते. प्रत्येक जण दुसऱ्याला प्रथम पहायला देत होता आणि नंतर स्वतः शांतपणे अवलोकन करत होता .

वेगवेगळ्या दालनांतून रचना , प्रकाशयोजना स्वतंत्ररित्या साकारली होतो . ‘ पिकासो ‘ आणि समकालीन कलाकारांची चित्रे , सारेजण एन्जॉय करत होते . मलाही प्रदर्शन बघताना खूप आनंद होत होता. नेहमीच पुस्तकातून पाहिलेली पेंटींग्ज आज जिवंत झाली होती. यापूर्वी सुद्धा कॅमलिन तर्फे मी युरोपला गेलो होतो तेंव्हासुद्धा असाच आनंद घेतला होता . पण आज एक वेगळी जाणीव होती- कलाकार होण्याचा मी जो निर्णय माझ्या आयुष्यात घेतला तो खूप योग्य होता . कारण आज १०० वर्षानंतर सुद्धा ” पिकासोच्या निर्मीतीकडे जनसामान्य आदराने पहात होते . एवढी उंची गाठणे शक्य नाही पण योग्य व्यवसाय मी निवडला याचे समाधान वेगळे होते.

तूर्तास एवढेच. मी ‘पिकासो’ कसा पाहिला ते दुसऱ्या भागात…..

क्रमश:

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.