Features

रसिकांचं प्रेम : एक सुंदर अनुभव

‘चिन्ह’ने कॉलेजीवनापासून भरभरून दिले आहे. कला महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा अगदी प्रथम वर्षापासून कलेच्या प्रांतात चाचपडणे सुरु होते. पण कला म्हणजे काय याचं ज्ञान ‘चिन्ह’च्या अंकांनी दिलं. ‘चिन्ह’चा पहिला अंक विकत घेतला तो ‘यत्न प्रयत्न विशेषांक’ म्हणजे अर्थातच गोयंचो सिंदबाद ! तिथपासून जणू अलिबाबाची गुहाच उघडी झाली. आणि सुरु झाला तो कला क्षेत्रातला न थांबणारा प्रवास.

काही वर्ष डिझाईन क्षेत्रात जॉब करत असताना मी रोज ‘चिन्ह’ची वेबसाईट ऑफिसला आल्या आल्या उघडून ठेवत असे आणि मग दिवसभर वाचन सुरु राही. या प्रवासात ‘चिन्ह’ची एक वाचक यापासून सुरु झालेला प्रवास आता ‘चिन्ह’ची कार्यकारी संपादक इथपर्यंत पोचला.

सतीश नाईक सरांनी काही महिन्यांपूर्वी ‘चिन्ह’साठी काम करण्याची संधी दिली. हे शिवधनुष्य आपल्याला पेलता येईल का याचे दडपण मनात होते. पण सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला तयार करत आहेत. अगदी माझ्या नवखेपणाच्या चुका सांभाळून घेत.’चिन्ह’चे काम करताना खूप आनंद मिळत आहे. आपल्याला जे आवडते ते काम करिअर म्हणून करता येण्याइतके दुसरे भाग्य नाही. ‘चिन्ह’सोबतच्या या प्रवासात अनेक सुखद अनुभव येत आहेत.

‘चिन्ह’चे अपडेट्स वाचकांपर्यंत थेट पोचवण्यासाठी आम्ही जे व्हाट्सअप ग्रुप तयार केले त्यात एक ग्रुप आम्ही नवोदित चित्रकारांना चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे म्हणून खुला ठेवला. तिथे अनेक कला रसिक, चित्रकार सहभागी झाले. या ग्रुपवर कोल्हापूरचे कला रसिक आणि चित्रकार रवींद्र चपाले सदस्य आहेत. त्यांना वाचनाची आवड असल्याने अनेक चित्रकलाविषयक पुस्तकांचा त्यांनी संग्रह केला आहे. माझं लिखाण त्यांना आवडलं म्हणून मला काही पुस्तके भेट देण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार मला ती पुस्तके पाठवून दिलीही. या पुस्तकात मौज प्रकाशित ‘अमेरिकन चित्रकला’ हे दुर्मिळ पुस्तक समाविष्ट आहे. ही सुंदर भेट मिळाल्या नंतर आनंद तर झालाच पण याबरोबर चपाले यांनी सुंदर हस्तलिखित पत्रही पाठवले. या पत्रात माझं कौतुक केलं आहेच पण पुस्तकांच्या बाबतीत कसलीही गरज लागली तर मला कळव अशी सूचनाही केली आहे.

रवींद्र चपाले यांनी पुस्तकांबरोबर पाठवलेलं सुंदर पत्र.

हे पत्र वाचून खरं तर आनंदाश्रू आले. आपण जे काम करतो हे रसिकांना आवडते यापेक्षा मोठं या जगात काय असू शकतं? ही संधी ‘चिन्ह’ने दिली त्याबद्दल सतीश नाईक सरांचे आभार आणि सोबत रवींद्र चपाले यांचे आभार तर शब्दात व्यक्तच करता येणार नाहीत. अनेकदा कला शिक्षणात सुधारणा व्हावी म्हणून आम्ही कडवट बातम्या देतो त्याबद्दल खूप लोक शिव्या देतात. त्यावेळी वाटते हे सर्व कशासाठी करतोय आपण, पण जेव्हा असं काही सुंदर पत्र हातात पडतं तेव्हा आपण योग्य मार्गावर आहोत याची जाणीव होते.

रवींद्र चपाले सर तुमचे खूप खूप आभार. आपले आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहू द्या!

– कनक वाईकर

****

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.