Features

शाकम कधी सुरु होणार?

आपण सध्या जुलै महिन्याच्या मध्यावर आहोत. आणि ऑगस्ट सुरु होईल लवकरच. पण धक्कादायक बाब ही आहे की शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छ. संभाजीनगर येथे नवीन शैक्षणिक वर्ष अजून सुरूच झाले नाहीये. हे महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे. या विद्यापीठाने विद्यापीठाच्या २०२३-२४ या वर्षासाठी जे शैक्षणिक परिपत्रक काढले आहे, त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी १५ जून २०२३ पासून नवीन शैक्षणिक सत्र सुरु करणे अपेक्षित होते. असे असताना नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करणे तर सोडाच तासिका तत्त्वावरील शिक्षक भरतीही महाविद्यालयाने अजून पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे सध्या महाविद्यालय परिसरात विद्यार्थी कुठेच दिसत नाहीत असे कळते.

२० जून रोजी प्रसिद्ध झालेली जाहिरात.

२० जून रोजी शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, छ. संभाजीनगरने सर्व प्रमुख वृत्तपत्रामध्ये कंत्राटी पद्धतीने तासिका तत्वावर प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखत आयोजनाची जाहिरात दिली होती. या जाहिरातीनुसार मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. निवड समितीवर महाविद्यालयाचे डीन प्रा. वडजे होते, त्याचबरोबर प्रा. तरतरे यांनाही निवड समितीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. खर तर तरतरे हे डिप्लोमा विभागाचे प्रमुख असताना त्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या शिक्षक निवडीच्या पॅनेलमध्ये स्थान कसे देण्यात आले हा अभ्यासाचा विषय आहे. २० जून रोजी ही मुलाखत प्रक्रिया पार पाडल्यानंतर डीन प्रा वडजे हे कॉलेजमध्ये अनुपस्थित आहेत. डीन साहेब हे वैद्यकीय रजेवर गेले असून अजून परत आले नाहीत असे कळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने या परिपत्रकात दि १५ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु व्हावे असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

तर ही जी मुलाखत प्रक्रिया पार पडली त्यानंतर तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नेमणूका अजूनही जाहीर केल्या गेलेल्या नाहीत. जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्टमध्ये सर्व शिक्षक नेमणूका यशस्वीपणे पार पडल्या. पण जेजे स्कूल ऑफ आर्ट असो किंवा छ. संभाजीनगरचे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय असो, अजून शिक्षकांची नेमणूकच झाली नाहीये. जर मुलाखत प्रक्रिया पार पडली आहे तर या नेमणुकीसाठी सदरील महाविद्यालय कोणता मुहूर्त शोधत आहे ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. या भरती प्रक्रियेबद्दलही काही कुजबुज कानावर येत आहेत. पण तूर्तास इतकेच. या कुजबुजीची चर्चा नेमणूक झालेल्या शिक्षकांची निवड यादी जाहीर झाल्यावरच करता येईल.

******

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.