Features

आजी माजी शिक्षणमंत्री… 

दोघांच्या दोन तऱ्हा!

( पूर्वार्ध )

अनन्य सन्मानसोहळ्यात सहभागी होण्यासाठी वांद्र्याच्या रंगशारदामध्ये गेलो असता आलेला अनुभव अगदी आयुष्यभर लक्षात राहील असा होता. हे वाक्य दोन्ही अर्थानं घेता येईल. एक म्हणजे ध्यानीमनी नसताना चिन्हला हा पुरस्कार मिळाला होता. झी पुरस्कारांचा वितरण सोहळा ज्या शाही पद्धतीनं आयोजित केला जातोत्याचं ज्या पद्धतीनं जगभर प्रसारण केलं जातं ते पाहता त्यात सहभागी होणं हा निश्चितच अत्यंत आनंदाचा क्षण असतो. या अर्थानं तो त्यादिवशी अनुभवता आला

दुसरा अर्थ अतिशय नकारात्मक आहे. पण त्याविषयी लिहिणं मात्र गरजेचं आहे. खरं तर पाडव्याच्या दिवशी हे लिहिणं योग्य नव्हे. काहीतरी चांगलं प्रसिद्ध करावं म्हणून अनेक नकारात्मक लेख आम्ही नंतर प्रसिद्ध करू म्हणून मागे ठेवले. पण आज एप्रिल रोजीच अनन्य सन्मानपुरस्कार सोहळ्याचं प्रसारण होणार असल्यानं त्यावर लिहिणं भाग पडलं

या सोहळ्यात प्रख्यात संगीतकार पं हृदयनाथ मंगेशकर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या साथीला मनसे प्रमुख राज ठाकरे होतेच आणि शिवाय आणखीन एका पाहुण्यांना म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांना या सोहळ्यात झी २४ तासनं सहभागी करून घेतलं होतं. सर्वश्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांनी अप्रतिम भाषणं केली. ती आज सायंकाळी आपणास प्रत्यक्ष ऐकता येतीलच. याच सोहळ्यात तिसरं भाषण झालं ते गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांचं. त्यांचं भाषण हाच या लेखाचा विषय आहे. एखादा पट्टीचा राजकारणी ज्या पद्धतीनं सभागृहावर चौफेर नजर टाकत आपल्या भाषणास सुरुवात करतो, त्याच पद्धतीनं दिलीपरावांनी आपल्या भाषणास सुरुवात केली

पण पहिल्याच वाक्यात त्यांची गाडी डिरेल झाली ! असं म्हणतात की, दिलीपराव त्यादिवशी थेट विधानसभेचं कामकाज आटोपूनच इथं आले होते. त्यांच्या आगमनाच्या वेळी जो लवाजमा थिएटरमध्ये घुसला त्यावरून माझा तरी तसा समज झाला, अन्यथाकारण पहिल्याच वाक्यात दिलीपरावांनी पं. हृदयनाथ मंगेशकरांचा उल्लेखदीनानाथमंगेशकर असा केला. त्यांनी ते वाक्य उच्चारताच नाट्यगृहातले सारेच एकमेकांकडे पाहू लागले. आपण हे काहीतरी चुकीचं ऐकतोय असा साऱ्यांना भास झाला. पण तो क्षणभरच टिकला. दुसऱ्या वाक्यात दिलीपरावांनी परत षटकार ठोकला ! पुन्हा त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांच्या जागी त्यांच्या वडिलांचं म्हणजे दीनानाथ मंगेशकरांचं नाव घेतलं. पुन्हा एकदा उपस्थित प्रेक्षकांमध्ये चमकून नजरानजर झाली

तो क्षण भयंकर होता. आपण एका मोठ्या समारंभाला आलो आहोत आणि ज्यांनी संगीतात आपली हयात घालवून प्रचंड मोठा नावलौकिक मिळवला आहे अशा व्यक्तीच्या सत्कार समारंभात सहभागी झालो असताना समोरच्या व्यासपीठावरील महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री सत्कारमूर्ती ऐवजी त्यांच्या वडिलांचंच नाव घेतोय. एकदा नाही दोनदा घेतोय यावर विश्वास बसणं खरोखरच अवघड होतं. पण ती वस्तुस्थिती होती आणि तसंच घडलं होतं.

तिसऱ्यांदा पुन्हा वळसेपाटलांनी तीच चूक केल्यावर मात्र सभागृहातून कुणीतरी खाणाखुणा करून त्यांना त्यांची चूक दाखवून दिली तेव्हा चेहऱ्यावर कुठलाही ओशाळवाणा भाव आणता वळसेपाटलांनी अत्यंत स्थितप्रज्ञपणे ( हे त्यांच्याकडूनच शिकावं ) आपल्याकडून चुकून हे झालं अशी कबुली दिली. तेव्हा उपस्थित श्रोतृवर्ग अक्षरशः गार झाला होता. व्यासपीठावर उपस्थित नितीन गडकरी, राज ठाकरे किंवा झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी अतिशय संयम दाखवून चेहऱ्यावर कुठलेही भाव येणार नाहीत याची घेतलेली काळजी स्पष्टपणे दिसली. वळसेपाटलांनी केलेला तो साराच प्रकार अतिशय संतापजनक होता. राज्याचा गृहमंत्री असे वागू शकतो ? इतक्या बेदरकारपणे बोलू शकतो ? इतक्या मोठ्या व्यक्तीचा सत्कार आपल्या हस्ते केला जातोय आणि आपण हे असे अकलेचे तारे तोडतोय याचे देखील भान त्यांना बाळगता आले नाही याचे खरोखरच नवल वाटले ! आणि अशी लोकं जर आपल्यावर राज्य करत असतील तर त्या राज्याच्या वर्तमानात आणि भवितव्यात काय वाढून ठेवलं आहे ? हे आपण रोजच अनुभवतो आहोत, अनुभवणारच आहोत

हे सारं लिहिलं यासाठी कारण हेच दिलीप वळसेपाटील सुमारे नऊ वर्ष या महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री होते. बाकी त्यांनी काय केलं याच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही, पण जेजे स्कूल ऑफ आर्टची मात्र यांच्याच काळात पुरती वाताहत झाली हे मात्र इथं पुन्हा एकदा अधोरेखित करावंसं वाटतं ( कसं तेचिन्हच्याकालाबाजार अंकात आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळमधल्या लेखांमधून वेळोवेळी मांडलंय ). पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणजे कुणी लल्लू पंजू संगीतकार नव्हेत. एकच उदाहरण देतो, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्याहे गाणं ऐकलेला आणि ते ऐकता ऐकता आतून हललेला मराठी ( मराठीच काय, बंगालीत सुद्धा ते गाणं तितकंच लोकप्रिय आहे ) माणूस मिळणं दुरापास्तच ! त्यांनी संगीत दिलेली एकेक गाणी म्हणजे मराठी संगीताचं कंठलेणंच आहे. ज्यांचं संपूर्ण घराणंच संगीताला वाहिलेलं आहे, भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांचे ते बंधू आहेत आणि मास्टर दीनानाथांचे सुपुत्र आहेत अशा व्यक्तीचाअनन्य सन्मानपुरस्कार वितरण सोहळ्यासारख्या  जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्राचा एक मंत्री, तो ही साधा सुद्धा नव्हे तर गृहमंत्री पं. हृदयनाथांना त्यांच्या वडिलांचं नाव चिकटवतो, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा तीच चूक पुन्हा पुन्हा करतो. हा साराच प्रकार शरमेनं मान खाली घालायला लावणारा होता. कार्यक्रमाच्या निवेदिका धनश्री दामले यांनी वळसेपाटलांचा उल्लेख महाराष्ट्राचे गृहमंत्री आणिकला जोपासकअसा केला होता. पण त्यांनी आपल्या कारकिर्दीतकाय काय कला जोपासलीयाचं चित्रणचिन्हनं वेळोवेळी करूनच ठेवलेलं आहे. आणि आता भविष्यात देखील याच ठिकाणावरून ते कार्य तसंच पुढं न्यायचं असंच आम्ही ठरवलं आहे. कारण आता १६५ वर्षाचं जे जे स्कूल ऑफ आर्ट अक्षरशः मरणपंथाला लागलेलं आहे

( उद्याच्या लेखात आजी शिक्षणमंत्र्यांच्या भाषणाविषयी.. अवश्य वाचा ! )

– सतीश नाईक  ( संपादक )

‘Chinha Art News’

Related Posts

1 of 67

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.