News & Views English

‘विकेंड कलर्स’चे उदघाटन राजन गवस यांच्या हस्ते !

नाशिक मिसळ क्लब च्या कलाकारांचे ‘वीकेंड कलर्स’ या समुह कला प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक प्रा. राजन गवस यांच्या हस्ते आज कोल्हापूरातील सराय कला दालनात संपन्न झाले. सध्याच्या राजकारणातले दडपण आणणारे पक्षीय रंग आणि कलाकारांच्या मनांतले सौंदर्यानुभूतीचे रंग यातला फरक सांगून, भविष्यात, हे कलाकारांचेच रंग समाजात सकारात्मक बदल घडवून आणतील असा आशावाद राजन गवस यांनी यावेळेस व्यक्त केला. या प्रसंगी राजन गवस यांनी अभिप्राय वहीत खालील चार ओळी नोंदवल्या …

रंग झुंजवले जात असताना
रंग लढवले जात असताना
रंग पाशवीरूप धारण करतांना
या चित्रकारांच्या चित्रातील रंगांनी
पुन्हा आशा निर्माण केल्या.
हे चित्रकारच समाजाला नवे रंग देतील.

धनंजय गोवर्धने यांनी याप्रसंगी ‘नाशिक मिसळ क्लब’ विषयी माहिती दिली. धनंजय गोवर्धने, चारुदत्त (सी एल) कुलकर्णी, नितीन बिल्दीकर, योगेश जोशी आणि सचिन पाटील, या कलाकारांच्या चित्र आणि छायाचित्रांचा या प्रदर्शनात सहभाग आहे. या प्रदर्शनाच्या उदघातांसाठी श्री व्यंकटेश बिदनूर, मिलींद रणदिवे, सिकंदर नदाफ, मुकुंदराव देशपांडे, डॅा. पी जी कुलकर्णी, जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी उपप्राचार्य अप्पासाहेब नेहते पाटील, गौतमी खडकतकर, अर्जुन खडकतकर, कोल्हापूरच्या रेखाटन समूहाचे कलावंत, कलानिकेतन चे विद्यार्थी इ. अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रदर्शनाचा कालावधी :
दि १९, २०, २१ मे २०२३
वेळ: सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:३० पर्यंत

*******

Related Posts

1 of 28

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.