No products in the cart.
औरंगाबाद कॉलेजची दुर्दशा!
फोटो फिचर कायम छान गोष्टींचे करायचे अशी ‘चिन्ह’ची परंपरा आहे. पण ज्या पद्धतीने औरंगाबाद कॉलेजच्या सफाईचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळे आज नकारात्मक स्टोरीचं फोटो फिचर करत आहोत. हे ‘चिन्ह’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. आजच्या या फोटो फीचरमध्ये औरंगाबाद कॉलेजची दुर्दशा तुम्हाला दिसेल. जेजेची इमारत ही १६० वर्ष जुनी आहे. तरी जेजेचे आजी माजी विद्यार्थी त्याचा कायम गवगवा करतात. १६० वर्षाची समृद्ध इमारत वगैरे. अर्थात ते चुकीचे आहे असं मुळीच नाही. औरंगाबाद कॉलेजची इमारत तर थेट औरंगजेबाच्या काळातील होती. ती हेरिटेज विभागाने काढून घेतली आणि सैन्याच्या बराकीसारखा तिचा वापर झाला. कोणी कुठलाच आवाज केला नाही. विद्यार्थ्यांना मग ठोकळ्यासारखी नवी इमारत बांधून देण्यात आली तिची पण अवस्था २० वर्षाच्या आतच अत्यंत वाईट झाली आहे.
औरंगाबादच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी ही अवस्था बघावी. ती बघून तुमच्या काळजाचं पाणी होत नसेल तर ‘वो खून नही पानी है’ असे फिल्मी डायलॉग आम्ही मारणार नाही. पण खरंच काहीतरी आवाज उठवणे गरजेचे आहे असं तुम्हाला वाटत नाही का? अगदी काहीच नाही तर या सर्व बातम्यांवर प्रतिक्रिया द्या. जेणेकरून आम्ही या बातम्या संबंधित शिक्षण विभागापर्यंत पोचवतो तेव्हा आपला आवाज क्षीण होणार नाही. जितक्या जास्त प्रतिक्रिया येतील तेवढा आवाज सशक्त होईल.
infochinhaartnews@gmail.com या आमच्या मेल आयडीवर किंवा थेट या बातमीच्या खाली लॉगिन करून आपली प्रतिक्रिया जरूर द्या. तरच ही चळवळ मोठी होईल. जर जेजेला स्वायतत्ता मिळत आहे तर औरंगाबाद कॉलेजच्या परिस्थितीत सुधारणा का नाही? हा प्रश्न पडायलाच हवा . ती नक्कीच होईल गरज आहे ती संघटित प्रयत्नांची.
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion