No products in the cart.
- Home
- Uncategorized
- कॅबिनेट निर्णय : जेजेला डिनोव्हा !
कॅबिनेट निर्णय : जेजेला डिनोव्हा !
बऱ्याच वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज अखेर जेजेला डिनोव्हो दर्जा मिळाला. दि २८ जून २०२३ रोजी म्हणजे आज दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयात जेजे स्कूल ऑफ आर्ट, जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टला डिनोव्हो दर्जा दिला गेला आहे. जेजेच्या आजवरच्या डिनोव्हो प्रक्रियेमधला हा अंतिम टप्पा होता. त्यामुळे या चळवळीत सहभागी झालेल्या जेजेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी ‘चिन्ह’कडे आनंद व्यक्त केला आहे. ‘चिन्ह’ने सुरुवातीपासूनच या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. किंबहुना जेजेला डिनोव्हो दर्जा देण्याचा विचार शासनातर्फे झाला याला कारण ‘चिन्ह’चा कालाबाजार अंक ठरला होता.
जेजेला डिनोव्हो दर्जा मिळाला याबद्दल चित्रकार आणि डिनोव्हो चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आशुतोष आपटे यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, ” ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गेली काही वर्ष आम्ही जो संघर्ष केला त्याचा हा परिणाम आहे. आता जेजेचा सुवर्णकाळ परत येईल याबद्दल मला खात्री आहे. आम्ही जेजेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी डिनोव्हो दर्जा प्रक्रिया सुरळीत व्हावी आणि या प्रक्रियेला सर्व माजी विद्यार्थ्यांची मदत व्हावी म्हणून ‘एक जेजे’ ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या कामी मदत करत राहू. किंबहुना ही आमची जबाबदारी आहे. येणाऱ्या विद्यार्थ्यांना या डिनोव्हो दर्जाचा खूप फायदा होणार आहे.”
सूत्रांकडून असं कळतं की, मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय झाला तेव्हा सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार, कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, सचिव नितीन करीर, मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. इतकंच नाही तर त्यांचा सक्रिय पाठिंबा या निर्णयाला होता. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील या निर्णयाबद्दल अत्यंत समाधानी होते. तर माजी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मात्र मौन धारण केलं असल्याचं कळतं.
*****
Related
Please login to join discussion