Features

चेंबूर जिमखान्यात चित्रकारांचं सेलिब्रेशन !

काल संध्याकाळी मुंबईतल्या बहुसंख्य चित्रकारांची पावलं चेंबूर जिमखान्याकडं वळली होती. निमित्त होतं ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांना मिळालेल्या ‘झी २४ तास’च्या ‘अनन्य सन्मान’ पुरस्काराचं सेलिब्रेशन. चित्रसंग्राहक केतन करानी आणि त्यांच्या पत्नी तृप्ती करानी यांनी या सेलिब्रेशन पार्टीचं आयोजन केलं होतं. सायंकाळी ०६.३० वाजता सुरु झालेली ही पार्टी उत्तरोत्तर रंगतच गेली. मधल्या दोन वर्षाच्या लॉकडाऊन गॅपमुळे मुंबईतले चित्रकार एकत्र येऊच शकले नव्हते, त्यामुळे सहभागी झालेला प्रत्येक चित्रकार खाण्या-पिण्याचा तसेच भेटण्याचा, गप्पा मारण्याचा आनंद घेताना दिसत होता.

 
‘झी २४ तास’चे संपादक निलेश खरे, चित्रपट समीक्षक अशोक राणे, अभिनेत्री मीना नाईक, अभिनेते प्रमोद पवार, केतन करानी, तृप्ती करानी, स्मिता शाह, तुषार शाह, मधुकर शाह, लीलावती शाह, तन्वी शाह, पुरातत्व विभागाचे तेजस गर्गे, पत्रकार विजयकुमार काळे, मुकुंद कुळे, सुनील तांबे, शिल्पा सरपोतदार, फोटोग्राफर सुधारक ओलवे, घनश्याम भडेकर, लेखक रविप्रकाश कुलकर्णी, रामदास खरे, शशिकांत सावंत, कमलेश देवरुखकर, आर्किटेक्ट प्रशांत वराडकर, पेंटरनेटचे प्रशांत शाह, कलासंचालक राजीव मिश्रा, आर्ट डीलर अभिजित गोंडकर, कॅलिग्राफर अच्युत पालव, रंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, डॉ. मंजिरी आणि राजीव ठाकूर, सुवर्णरेहा जाधव, नीता पाठारे, संदेश नामनाईक यांच्याखेरीज चित्रकार सुनील गावडे व त्यांच्या पत्नी उषा गावडे, माणिक आणि राज शिंगे, प्रकाश राजेशिर्के, वासुदेव कामत, अनिल नाईक, अरविंद हाटे, नितीन दादरवाला, आशुतोष आपटे, प्रकाश वाघमारे, सतीश डिंगणकर, विशाखा आपटे व राजेश अंबाळकर, शिल्पा जोगळेकर, प्रिया पाटील, नितीन अरुण कुलकर्णी, रत्नदीप अडिवरेकर, ज्योती आणि पांडुरंग देवधरे, भावना सोनवणे, कुमार वैद्य, स्वीटी आणि संजय सावंत, प्रदीप शिंदे, सचिन चौधरी, प्रीतम देऊस्कर, स्नेहल व प्रताप मोर्ये, जितेंद्र सुरळकर ( पिसुर्वो ), लक्ष्मण चव्हाण अशी नव्या पिढीतील असंख्य नामवंत कलावंत मंडळी या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. या सेलिब्रेशनची ही काही क्षणचित्रे. 

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.