Features

गणपतीवाले दाभोलकर

गणपतीवाले दाभोलकर माहीत नाही; असा मराठी माणूस विरळाच! ८० च्या दशकात त्यांची ग्रीटिंग्स खूप गाजत होती. पण ग्रीटिंग्सच्या छोट्या आकारात काम करण्याने दाभोलकरांना समाधान मिळत नव्हते. तेव्हा काही मार्ग सापडावा म्हणून ते कोल्हापूरच्या रवींद्र मेस्त्री यांच्याकडे आपले काम घेऊन गेले. मेस्त्री यांनी त्यांना ग्रीटिंग्समध्ये अडकून न राहता मोठ्या कॅनव्हासवर काम करण्याचा सल्ला दिला. मोठ्या कॅनव्हासवर काम करताना त्यांना हळूहळू फॉर्म सापडला आणि गणपतीची चित्रे साकार होऊ लागली. आणि तिथूनच त्यांचा गणपती चित्रांचा प्रवास सुरू झाला. त्यांची गणेश चित्रे मोहक आहेत. त्यांचे रंग कॅनव्हासवर सहजपणे ओघळत जातात. त्यातून सुंदर अशी गणेश प्रतिमा साकार होते. गणेशोत्सवानिमित्त अरुण दाभोलकरांनी आपली काही खास गणेशचित्रे चिन्ह आर्ट न्यूजच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत.


दाभोलकरांच्या गणेश चित्रांमध्ये तेजस्वी रंगांचा वापर असतो. त्यानंतर इंकच्या साहाय्याने ते चित्रातील छोटेछोटे तपशील पूर्ण करतात. या इंकच्या आउटलाईनमुळे चित्राला उठावदारपणा येतो.

आपल्या कलेबद्दल सांगताना दाभोलकर म्हणतात की, ‘मला गणेशाचा आकार कुठेही सहज दिसतो. तो कधी नारळाच्या करवंटीत दिसतो तर कधी समुद्रकाठच्या शिंपल्यात. कधी झाडाच्या खडबडीत बुंध्यातही. हे आकार मग कॅनव्हास वर दिसू लागतात’. आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल सांगताना दाभोलकर म्हणतात,’रंगाचा गुळगुळीत थेंब ग्लॉसी कागदावर सोडला की ब्रशच्या साहाय्याने त्याला हवे तसे फिरवायचे. असे करता करता हळूहळू गणेश प्रतिमा त्यातून साकारत जाते.

गणपती हे असे दैवत आहे, ज्याचे चित्र काढताना मूर्त- अमूर्त अशा कुठल्याही शैलीचा आधार घेतला तरी चित्रात मांगल्य, सात्विकता आपोआप येते. चित्र काढताना दाभोलकरांनी चित्रातली सात्त्विकता जपली. ते चित्र काढताना कधीही पेन्सिल स्केच काढत नाहीत. त्यांच्या मते पेन्सिल स्केच केले की चित्राला मर्यादा येते. त्यामुळे ते थेट रंगांनीच सुरुवात करतात.

सेलिब्रिटींपासून सामान्य रसिकांपर्यंत सगळ्यांनाचं त्यांची गणपती चित्रे प्रचंड आवडतात. राजा रवी वर्मा यांची देवादिकांची चित्रे जशी घराघरात पोहोचली त्याचप्रमाणे दाभोळकरांची गणेश चित्रे आज घराघरात पोहोचली आहेत. मुंबईच्या बांद्रा आर्ट स्कुलमधून सुरू झालेला त्यांचा चित्रप्रवास आता दाभोलीला त्यांच्या गावी विसावला आहे. तिथून त्यांची गणेश चित्रे आता जगभर पोचतात.

चित्र काढताना अरुण दाभोलकर

****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील व्हाट्सएप लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/KGQC5yb4CyR6fvFrJPGnJq

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी चिन्हचे फेसबुक पेज लाईक करा.
https://www.facebook.com/chinha.art

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.