Features

चारही पुस्तकांची जन्मकथा !

चित्रकार राज शिंगे यांच्या चार पुस्तकांचं प्रकाशन शनिवारी ठाण्यात होत आहे. त्या निमित्तानं त्यांनीच सांगितलेली या पुस्तकांची जन्मकथा.

१९७४/७४ ते१९८३/८४ पर्यंत मी जे.जे.कला महाविद्यालय परिसरात वावरलो,जगलो, सुरवातीला उपयोजित कला विभाग आणि नंतर फाईन आर्ट(मेटल क्राफ्ट ) अशी वर्षे सरत होती,पण मित्रमंडळी लिहीत असताना कधी कविता,लेखन करण्याचा मोह झाला नाही, बरोबर सुंदर लिहिणारा संजय पवार,रघुवीर कुलकर्णी,पुरुषोत्तम बेर्डे,विश्वा यादव असे कलंदर लोक सान्निध्यात असताना कधीही लिहिण्याचं धाडस केलं नाही.

कला महाविद्यालयात एकांकिकात अभिनय करताना मी जे.जेत हुंदडलो पण लिहायची सुरवात मनाच्या संवादातून झाली.मन बोलू लागलं आणि कविता लिहू लागलो, पण दाखवायचं धाडस झालं नाही. लग्न १९८५ साली माणिक बरोबर झालं आणि सहजीवनात , कलेत जगताना नकळत कविता घडत गेल्या . १९९७ साली माझा पहिला चित्र-काव्य ‘स्वगत’ चित्रकार प्रभाकर कोलते सरांच्या हस्ते प्रसिद्ध झाला.२००३ साली जहांगीरच्या आमच्या दोघांच्या कला प्रदर्शनात ‘लगोरी’ काव्यसंग्रह श्री रामदास फुटाणे यांच्या हस्ते प्रसिद्ध झाला.

कविता ,लेखन या जगण्याच्या प्रक्रिया आहेत . शब्द साथ सोबत करत असतात.तब्बल १८/१९ वर्षा नंतर तिसरा काव्य संग्रह ‘काडी’ हा प्रसिद्ध करण्याच्या तयारीत असताना, जगण्याची पद्धत बदलली,सर्व बंदिस्त झालं . चार भिंतीत वावरताना एकांतात मी समाज,स्त्री,रोजच्या जगण्याच्या आंदोलनात राम प्रहरी लेखन करून फेसबुक ,वॉट्सअपवर प्रसिद्ध करीत समाजाशी बोलू लागलो आणि ‘सोरट’ या स्वैर ललित लेखनाचा जन्म झाला.त्या लेखनात बागडताना रोज लिहिण्याच्या नादात गतकालीन सर्बिया देशाच्या कला प्रवासाबद्दल क्रमशः लिहिताना अनेक रसिक मित्रांना माझ्या ‘झोरीचा आणि सर्बिया’ हे भाग आवडू लागले, प्रतिक्रिया,फोन,वाचक मित्र,मैत्रिणी वाढल्या . पुढचा भाग कधी लिहितो या आग्रहाने झोरीचाचे ५३ भाग लिहून झाले. पुन्हा बंदिस्त काळ वाढला. प्रवास ,मास्क,वावरण्याच्या बंधनात ,चार भिंती,घर ,एकांतात मन प्रवास करू लागलं . ७ मे २०२१ पासून २६- २७ वर्षापूर्वी १९९४ साली मी आणि माणिक आम्ही दोघांनी शांतिनिकेतन मध्ये  दोन महिने वास्तव्य आणि चित्रशिल्पकाम करत आनंद घेतलेला . सहप्रवास , शांतिनिकेतन परिसर,गुरुदेव शिकवण,निसर्ग,पाऊस,वादळ,राहणीमान,जनजीवन अनुभवताना भेटलेल्या ८०वर्षे वयाच्या रानी माँ चित्रकर्तीचा सहवास,अनेक भेटलेली माणसे त्यांचे जिवंत अनुभव  लेखन एकंदर वीस भागात क्रमश झालं . शांतिनिकेतनचं लेखन सहज,आपसूक घडत गेलं. समाज माध्यमात ,या लिखाणाचं खूप कौतुक झालं .फोन,मेसेजेस येऊन हे अनुभव पुस्तक रुपात यायला हवेत हा आग्रह झाला. जगण्याची परिस्थिती बदलत गेली,सामाजिक टाळेबंदी, करोना काळ बाजूला सरला गेला २०२२ वर्षाच्या सुरुवातीला गीतेश शिंदे हा मित्र भेटला,’सृजनसंवाद’ प्रकाशन संस्थेच्या सहकार्यानं १)काडी-कविता संग्रह. २)झोरीचा आणि सर्बिया-प्रवास वर्णन. ३)सोरट-ललित स्वैर लेखन. ४) शांतिनिकेतन-सहप्रवास अशी चार पुस्तके एकत्रित आकारात येत गेली. गीतेश शिंदे हे कवी, लेखक,संपादक असल्यामुळं या पुस्तकाला सुंदर वळण लागलं. मुखपृष्ठ देखणी झाली .मागल्या तीन महिन्यात ही चारही पुस्तके आकार घेऊ लागली. हा पूर्ण संच स्वरूपात वाचकांना नजराणा बहाल करावा या सुंदर हेतूनं या चारही पुस्तकाचं एकत्रित प्रकाशन १४ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील- मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे, येथे संपन्न होत आहे.

राज वसंत शिंगे
९९६७६७९११०
rajshinge@gmail.com

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.