Features

दंतकथेची गोष्ट

बघता बघता कलाप्रवासाच्या दुसऱ्या पर्वाला सहा महिने उलटले. मागे वळून बघितलं तर एकाच नजरेच्या टप्प्यावर काश्मीर आणि कन्याकुमारी आहे असं वाटतय. भारत उभा आडवा चाचपडला. हाती जे लागलय ते अफलातून आहे. कुठल्याही विश्वविद्यालयाने दिला नसता तो ज्ञानाचा, अनुभवाचा साठा मला ह्या प्रवासात मिळतोय. नाना प्रकारच्या  जाती जमाती, आदिवासी ह्या भारतात आहेत. सगळ्यांची भाषा, रीतिरिवाज , कथा पुराण, कला, वेशभूषा, खानपान सगळच भिन्न. कुठे रावण जाळतात तर कुठे त्याची पूजा होते. टोकाचा विरोधाभास.

ह्या सगळ्या जनजातीच्या लोककथा ,लोकगीते, आणि लोककला सगळचं भन्नाट आहे. आदिवासींचे त्यांच्ये त्यांचे वेगळे देवी देवता. निसर्गातले घटक त्यांच्यापण वेगवेगळ्या कथा. मी कुठे जातो तर आवर्जुन तिथल्या लोकांमध्ये असणाऱ्या दंतकथा आणि गाणी ह्याचा शोध घेत असतो. त्यात बऱ्याच सांकेतिक गोष्टी असतात, संदर्भ असतात जे त्यांच्याविषयी काही सांगत असतात.मला आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा मी ओरिसाच्या आदिवासींची एक दंतकथा ऐकली. ही कथा आहे प्रलयाची आणि माणसाच्या उत्पत्तीची.  डांगरिया कंध आदिवासी लोकांची ही दंतकथा.

फार फार पूर्वी पृथ्वीवर माणूस फार माजला होता. जगातलं पाप वाढलं होत. लोकसंख्या भरपूर वाढली होती. ते पाहून धरम देवता (सूर्य) संपूर्ण पृथ्वीवर पुर आणतो. माणसाला संपवण्यासाठी त्याने हा प्रलय आणला होता. पण ह्या आदिवासीमध्ये दोन भाऊ बहिण होते डूकु आणि डुंबे. डूकु आणि डुंबे एक नाव बनवतात आणि त्यात बसतात आणि प्रलयातून ते दोघे वाचतात. 

प्रतीकने प्रवासात केलेलं एक स्केच

 इकडे धरम देवता त्याच्या केसांपासून कावळा बनवतो आणि त्याला पृथ्वीवर पाठवतो पाहायला की कोणी जिवंत आहे की नाही.  कावळा पृथ्वीला चक्कर मारतो आणि डूकू डुंबे च्या नावे बद्दल धरम देवाला सांगतो. धरम देवता सैनिकांना पाठवून त्यांना दरबारात हजर करतात.  आणि शिक्षा म्हणून वेगवेगळ्या कारावासात टाकतात.  अनेक वर्ष कारावासात राहून दोघांनाही एक त्वचा रोग होतो. ज्यामुळे त्यांचे चेहरे वेगळे दिसू लागतात. धरम देवता त्यांना बाहेर काढतो आणि त्यांचा विवाह लावतो. दोघेही ओळखत नाहीत की आपण बहिण भाऊ आहोत. पुढे त्यांना मुले, आणि मुलांना मुले असं करत करत आज आपण पृथ्वीवर आलो. अशी ही दंतकथा.     

थोडी ओळखीची वाटते ना कथा? 

हो.  बायबल मधल्या नोहा ची गोष्ट अगदी ह्याचं साच्यातली आहे. पण ह्या आदिवासींमध्ये अजून ख्रिचन पोहोचले नाहीत. यांनी कधी बायबलही वाचलं नाही. आदिवासींच्या गोष्टी सर्वात जुन्या असतात. मग पृथ्वीवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा संपर्काची साधनं काही नव्हती तेव्हा गोष्टी कश्या एवढया मिळत्या जुळत्या असू शकतात. पृथ्वीच्या उत्पत्तीच्याही अनेक दंतकथा आहेत. जगभरातील आदिवासींच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. आणि आश्चर्याने त्यात तेवढेच साम्य ही आहे. 

खरंतर या सगळ्या मानववंश शास्त्राच्या भानगडी आहेत पण प्रवासात हा अनुभव रंजक आहे. माणसं एकाच ठिकाणाहून जगभरात पसरले हेही कारण असू शकतं का ह्या मागे? मला प्रकर्षाने वाटतं की जगभरातील दंतकथा एका ठिकाणी गोळा करायला हव्यात. त्यातूनही आदिम माणसाबद्दल काही खुलासा होऊ शकतो. जरी हा माझा प्रांत नसला तरी प्रवासात सगळच मिळत जातं. जे मिळेल ते झोळीत घेत पुढे जायचं. 

आदिवासी चित्रांमध्ये कुठेही पाहिलं तर आपल्याला सूर्य आणि चंद्र दिसतोच दिसतो. मग ते वारली असो, पिठोरा असो किंवा कोणताही कला प्रकार. ह्याचं कारण मला स्नेहल खेडकर यांनी सांगितलं होतं की आदिवासींच्या दंतकथा सूर्य चंद्राच्या अवतीभोवती फिरतात. म्हणून त्यांच्या चित्रामध्येही ते प्रकर्षाने जाणवतात. फक्त भारतीय लोककला नाही तर जगभरातील लोककलांमध्ये सूर्य चंद्राच्या गोष्टी आढळतात.

****

प्रतिक

गच्चीवरच्या गप्पा या चिन्हच्या यूट्यूब चॅनलवरील प्रतीकची मुलाखत आवर्जून बघा.

प्रतीकचे आधीचे लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
नग्नतेचं अवडंबर नाकारणारा समाज
https://chinha.in/features/a-bicycle-tour-in-search-of-art-pratik-jadhav-rural-odisha/

ग्रामरक्षक देवता
https://chinha.in/features/kalapravas-artist-pratik-jadhav-art-journey-at-tanjavur-tamilnadu-chettinad/

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.