Features

सायकलवरून भारत भ्रमण …

सायकलवरून भारत भ्रमण करणाऱ्या प्रतीक जाधवचा सायकल प्रवास दि ६ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण होणार आहे. या मोहिमेचा अखेरचा टप्पा तो ठाण्यात ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांच्या घरी सेलिब्रेट करणार आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा प्रतिकने ही मोहीम सुरु केली होती तेव्हा त्याच्या समोर खूप मोठी आव्हाने होती. मोहिमेला खर्चही खूप येणार होता. ‘चिन्ह’ला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ‘चिन्ह’च्या माध्यमातून त्याला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या आवाहनामुळे एका व्यक्तीनं तर प्रतीकला महागडी सायकल ही दिली. सगळंच इथं लिहिण्यापेक्षा तुम्ही ते ५ तारखेला प्रतीकची लाईव्ह युट्यूब मुलाखत होणार आहे त्यात नक्की ऐका.

चार वर्षांपूर्वी स्नेहल बाळापुरे यांनी प्रतीकच्या या मोहिमेविषयी माहिती देणारा लेख लिहिला होता. तो आवर्जून वाचा. आणि ५ तारखेला संध्याकाळी ५ वाजता प्रतीकची मुलाखत नक्की बघा. या कार्यक्रमात ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक आणि त्यांची सहकारी कनक वाईकर , प्रतीकबरोबर संवाद साधणार आहेत. गीता कुलकर्णी प्रतीकचा परिचय करून देतील आणि सूत्रसंचालन देखील करतील.

कार्यक्रमात प्रतीकला आलेले अनुभव, विविध आदिवासींची लोककला, प्रतीकचे पुढचे प्लॅन्स याबद्दल प्रेक्षकांना जाणून घेता येईल. या लेखाच्या शेवटी ‘चिन्ह’च्या युट्यूब चॅनलची लिंक देत आहोत. तिथे जाऊन चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

“पंख असणाऱ्यांना क्षितिजाची तमा नसते… ” असं म्हणतात. ते खरंच आहे. ‘प्रतीक जाधव’ या बीडमधील वडवणीसारख्या छोट्याशा गावातून आलेल्या ध्येयवेड्या तरुण कलाकाराची ही कहाणी… ऐकल्यानंतर या वाक्याची साक्ष नक्कीच पटेल. ‘प्रतीक जाधव’ जेजे स्कूल ऑफ आर्टच्या शिल्पकला विभागातील अंतिम वर्ष पूर्ण करून कलाक्षेत्रात आपले पाय रोवण्यासाठी धडपड करणारा एक विद्यार्थी आहे. प्रतीकनं शिल्पकलेत अनेक पारितोषिकं मिळवलीत. राज्य कला प्रदर्शनात नाशिक इथं त्याच्या कलाकृतीला ‘राज्य’ पुरस्कार मिळाला आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्याला देखील कलाक्षेत्रात उच्च शिक्षण घ्यायचं आहे . पण त्याची सुरवात करण्याआधी त्याला स्वतःचं एक मोठं ध्येय साध्य करायचं आहे, कलावंत म्हणून कलेसाठी एक धाडसी पाऊल घ्यायचं आहे.  ते म्हणजे  “त्याला भारतभरातील कलांचं दस्तावेजीकरण करायचं आहे. एवढंच नाही तर हे दस्तावेजीकरण करण्यासाठी तो लवकरच भारत भ्रमंतीला निघणार आहे .. तेही सायकल घेऊन “.   प्रतीकची ही संकल्पना नक्कीच धाडसी आणि कौतुकास्पद आहे.

भारतात जिथं जिथं कला जोपासली जाते, ज्या राज्य, शहर किंवा गावात कला संस्कृती आजही जतन करून ठेवली आहे अशा भारताच्या छोट्या मोठ्या सगळ्या शहरात तो सायकल घेऊन प्रवास करणार आहे. त्याची ही संपूर्ण संकल्पना अंमलात आणायला त्यानं नियोजनबद्धरित्या काम केलं आहे. साहाजिकच त्याच्या या हिंमतीला दाद दिल्या वाचून राहवत नाही.
कलाक्षेत्रात नावं व्हावं म्हणून बरीच लोक धडपड करीत असतात. पण २४ वर्षाच्या प्रतीकची धडपड मात्र स्वतःसाठी नसून या कलाक्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, अनेक दुर्गम भागातील मुलं जे कलागुणांनी संपन्न असतात पण कलेचं शिक्षण असतं हे देखील ज्यांना माहित नसतं अशांसाठी आहे. याशिवाय अनेक दुर्गम भागातली छुपी कला शोधून काढणं हे देखील त्याचं उद्धिष्ट असून त्या कलांचं दस्तावेजीकरण हा देखील त्याचा मुख्य हेतू आहे. हे सगळं त्याला त्या त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊनच करायचं आहे म्हणून तर त्याची ही भारत स्वारी तो सायकलनं पूर्ण करण्याच्या त्याच्या निश्चयावर अगदी ठाम आहे.

सायकलचा त्याचा हा प्रवास मोठ्या नावीन्य पद्धतीनं त्यानं आखला आहे. प्रवास करतांना दर मैलावर होणाऱ्या प्रत्येक सूक्ष्म बदलांचा त्याला अनुभव घ्यायचा आहे. त्याच्या नोंदी तो लेखी स्वरूपात करणार असल्याचं त्यानं सांगितलं . शिवाय काही आवडणाऱ्या कलांचं , शहरांचं दस्तावेजीकरण, रेखाटनं आणि व्हिडीओ स्वरूपात करायचं देखील त्यानं ठरवलं आहे. हा प्रवास पूर्ण करायला त्याला तब्बल एक वर्ष दोन महिने एवढा कालावधी लागणार आहे. दररोज अंदाजे  ७० किलोमीटर एवढं अंतर सायकलनं कापून हा प्रवास करण्याचा त्याचा निश्चय आहे.  या सगळ्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींवर ताकदीनं मात करण्यासाठी तो मानसिकदृष्ट्या किती खंबीर आहे याचा अंदाज त्याच्या बोलण्यातून नक्कीच जाणवतो.

अवघ्या २४ वर्षाच्या या तरुणात इतका आत्मविश्वास आणि ऊर्जा कुठून आली ? एकट्यानंच हा प्रवास सुरु करून येणाऱ्या कुठल्याही संकटावर भिडण्याची ताकद तू कुठून आणलीस ? तुझ्या कुटूंबातील लोक कशी साथ देतात ? असे प्रश्न त्याला लागोपाठ  विचारल्यावर प्रतीक थोडा वेळ शांत बसला आणि मग  दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, ” मला कसलीही भीती नाही वाटतं कारण, मी सहावीत असतांना बाबांचं निधन झालं आणि  बारावीत असतांना नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयांत प्रवेश घेतला तेव्हा आईची प्रकृती फारशी बरी नव्हती आणि अचानक तिनं  देखील या जगाचा निरोप घेतला …. त्यामुळं मी नागपूरचं शिक्षण अर्धवट सोडलं…आणि स्वतःला थोडं सावरून  जेजे मध्ये नव्यानं प्रवेश घेऊन शिक्षणाला सुरुवात केली … आता माझ्या कुटुंबातला मी एकटा सदस्य आहे. नातेवाईक आहेत पण ते  गावाकडं असतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय कमी वयातच घेण्याची ताकद मला नियतीनं दिली आहे ” प्रतीकच्या या उत्तरांनी मन क्षणभर सुन्न झालं … पण त्याच्या खंबीरपणाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे .

अवघ्या २४ वर्षाच्या या तरुणात इतका आत्मविश्वास आणि ऊर्जा कुठून आली ? एकट्यानंच हा प्रवास सुरु करून येणाऱ्या कुठल्याही संकटावर भिडण्याची ताकद तू कुठून आणलीस ? तुझ्या कुटूंबातील लोक कशी साथ देतात ? असे प्रश्न त्याला लागोपाठ  विचारल्यावर प्रतीक थोडा वेळ शांत बसला आणि मग  दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, ” मला कसलीही भीती नाही वाटतं कारण, मी सहावीत असतांना बाबांचं निधन झालं आणि  बारावीत असतांना नागपूरच्या चित्रकला महाविद्यालयांत प्रवेश घेतला तेव्हा आईची प्रकृती फारशी बरी नव्हती आणि अचानक तिनं  देखील या जगाचा निरोप घेतला …. त्यामुळं मी नागपूरचं शिक्षण अर्धवट सोडलं…आणि स्वतःला थोडं सावरून  जेजे मध्ये नव्यानं प्रवेश घेऊन शिक्षणाला सुरुवात केली … आता माझ्या कुटुंबातला मी एकटा सदस्य आहे. नातेवाईक आहेत पण ते  गावाकडं असतात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय कमी वयातच घेण्याची ताकद मला नियतीनं दिली आहे ” प्रतीकच्या या उत्तरांनी मन क्षणभर सुन्न झालं … पण त्याच्या खंबीरपणाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे .

ही भली मोठी सफर करतांना त्याला जेवण, तंबू , औषध, रस्ता शोधायला मदत करणारं GPS ,ऐतिहासिक ठिकाणं बघतांना लागणारी तिकिटं इत्यादी खर्चासाठी आपल्या सगळ्यांची आर्थिक मदत त्याला नक्कीच लागणार आहे.  साधारण २ लाख ६२ हजार इतका त्याला एका वर्षाचा खर्च येणार आहे. या सगळ्या प्रवासात आपण त्याला थोडं थोडं का होईना आर्थिक साहाय्य केलं तर नक्कीच प्रतीकचं एक ध्येय पूर्ण करण्यास त्याला आपण मदत करू शकू.  ८९२८६ ८२३३० प्रतीकच्या या मोबाईल नंबरवर संपर्क करून आपण त्याला  मानसिक आणि आर्थिक पाठबळ देखील देऊ शकता.

त्याच्या या अनोख्या कलाप्रवासाला  तो २६ मे रोजी सुरुवात करणार आहे. त्याच्या या  ध्येयवेड्या आणि रोमांचक अशा कलाप्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा  देऊ या !

खालील लिंकवर जाऊन ‘चिन्ह’चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.

https://www.youtube.com/@ChinhaMagazine

 

*****
– स्नेहल  बाळापुरे

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.