No products in the cart.
केरकरांचे ‘नारी इन सारी’ इन्स्टॉलेशन!
गोव्याचे सुबोध केरकर इन्स्टॉलेशन कलाप्रकारात नेहमीच अभिनव प्रयोग करतात. नुकतीच सुबोध केरकरांनी ‘नारी इन सारी ‘या परफॉर्मन्स इंन्स्टॉलेशनची घोषणा केली आहे. या इंस्टॉलेशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सर्व महिलांना केले आहे. इच्छूक महिलांनी साडी नेसून गोव्याच्या मोरजीम बिच येथे दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता पोहोचायचे आहे. या परफॉर्मन्स इंस्टॉलेशनमध्ये सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून सहभागी होता येईल. कला आणि साडीप्रेमी महिलांसाठी हा वेगळा आणि कलात्मक अनुभव असेल.
या परफॉर्मन्सचे शूटिंग ड्रोन आणि कॅमेराने केले जाणार आहे. सहभागी महिलांना या कार्यक्रमाचा फोटो सुबोध केरकरांच्या स्वाक्षरीसहित मिळेल. या इंस्टॉलेशनमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व सहभागी महिलांनी गैरसोय टाळण्यासाठी सोयीची पादत्राणे घालून येणे आवश्यक आहे. स्वतःचे खाणे आणि पाणी सोबत आणणे आवश्यक.
या परफॉर्मन्स इंस्टॉलेशनमध्ये सहभागी होण्यासाठी फॉर्मची लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfIz_hQtQbN4FKehsWPJb27NNZzsF5MVfSbwo5KFmbj5JZ4rg/viewform
अधिक माहितीसाठी 8583944800 या क्रमांकावर संपर्क करावा.
****
‘चिन्ह’चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/J3E5Y5hTzDXEEWD4cQW2rP
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
Related
Please login to join discussion