News

जहांगीरमध्ये खानदेशी चित्रकार!

मुंबई, ५ डिसेंबर

 

जहांगीर आर्ट गॅलरीत ४ डिसेंबरपासून खानदेशातील चित्रकार समूहाचं चित्र प्रदर्शन सुरु झालं आहे. सर्वश्री जितेंद्र अशोक साळुंके, वीरेंद्र रंगराव सोनवणे, धनराज पाटील, लक्ष्मीकांत सोनावणे या चोपडा येथील कला  महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत.

खानदेशातल्या चोपडा, पारोळा, शिंदखेडा या भागांत आणि मुंबईत स्थायिक झालेल्या या कलावंतांनी विविध अनुभव चित्रातून मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्यातल्या धनराज पाटील यांच्या चित्रांनी मुंबईकर रसिकांनी लक्ष वेधून घेतल्यास नवल नाही.

जहांगीरमधील हे प्रदर्शन १० डिसेंबर पर्यत खुले राहणार आहे.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.