No products in the cart.
ऋतुरंगमध्ये युक्रेनिअन आर्टिस्टचं मनोगत
यंदाच्या ऋतुरंग दिवाळी अंकात हेलन पनास्युक या युक्रेनियन चित्रकर्तीचं मनोगत वाचता येईल. रशियाच्या युद्धखोरीमुळे युक्रेनसारख्या शांत आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न देशाची किती वाईट अवस्था झाली याचं चित्रण या मनोगतात वाचायला मिळेल. हेलन ही व्यवसायाने चित्रकार. तिची अनेक प्रदर्शने युरोपमध्ये झाली. पण युध्दासारख्या भीषण प्रसंगामुळे, ज्या युरोपमध्ये ती आमंत्रित म्हणून मानाने गेली होती तिथेच निर्वासित म्हणून जायची वेळ तिच्यावर आली. चित्रकलेवर तिचं अत्यंत प्रेम. त्यामुळे युरोपमध्ये निर्वासित म्हणून जगतानाही ती तिथे रंगांच्या शोधात फिरली. जवळच्या मोजक्या शिलकीतून खर्च करावा की नाही या विचारात असताना एका दुकान मालकिणीने सहानुभूतीने तिला रंग स्वस्तात दिले. असे प्रसंग मन हेलावून टाकतात.
या लेखात हेलनचा चित्रकार म्हणून प्रवास, युध्दाच्या वेळी तिच्या कुटुंबावर आलेली संकटं आणि शेवटी इटलीत निर्वासित म्हणून झालेला प्रवेश या सगळ्या घटनांचं चित्रण वाचता येईल. हे एक छोट्या स्वरूपातील आत्मवृत्तच आहे पण त्याला किनार आहे ती युध्दाच्या भयंकर प्रसंगाची. प्रणव विजयकुमार पाटील यांनी या मनोगताचं शब्दांकन केलं आहे. चित्रकारांनी तर हा लेख आवर्जून वाचायलाच हवा.
‘चिन्ह’चे मुख्य संपादक सतीश नाईक ‘पॅलेट’ या युट्युब कार्यक्रमात, या मनोगताचे शब्दांकन करणारे प्रवीण पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत.
ऋतुरंग दिवाळी अंक
किंमत रु. ३००
******
हेलन पनास्युक यांचं इंस्टाग्राम पेज : https://www.instagram.com/helenpanasiuk/?hl=en
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion