No products in the cart.
‘नग्नता’ घ्या आणि ‘गायतोंडे’, ‘चित्रसूत्र’ भेट मिळवा !
१३५० किंमतीचे संग्राह्य साहित्य फक्त ८२५ मध्ये !
तिकडे पुण्यात एका फोटोग्राफरने काढलेल्या न्यूड फोटोग्राफ्सच्या प्रदर्शनावर बंदी आली, तर त्याचवेळी नाशकातले चित्रकलेचे विद्यार्थी मात्र मोकळेपणानं सेमी न्यूड लाईफ मॉडेलवरून चित्र रेखाटण्याचा सराव करत होते. पुण्यातल्या केवळ वृत्तपत्रानीच नाही तर वाहिन्यांनी सुद्धा हे प्रकरण लावून धरलं. पण त्या फोटोग्राफरचं मात्र व्हायचं ते नुकसान झालंच. यावरून ‘चिन्ह’च्या ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ या विशेषांकाची आठवण येते. तुम्ही पाहिलाय का तो अंक ? नसेल तर आजच पहा ! पाहताक्षणी तुम्ही त्याच्या प्रेमातच पडाल !
अंक प्रसिद्ध झाल्याला आता जवळजवळ एक तप उलटलं आहे. कलात्मकतेची सर्वच मूल्ये जपलेल्या ७५० रुपये किंमतीच्या या अंकाच्या पानापानांवर प्रसिद्ध झालेल्या एकाही न्यूड पेंटिंग किंवा फोटोग्राफवर आजतागायत कुणीही विरोधाचा चकार शब्दही उच्चारलेला नाही, हे आवर्जून सांगावंसं वाटतं. या अंकाची आता तिसरी आवृत्ती चालू आहे. त्याच्याही आता शेवटच्याच काही प्रती उरल्या आहेत. ‘चिन्ह’नं देखील आता संपूर्णतः डिजिटल स्वरूप धारण केलं असल्यामुळे या अंकाची नवी आवृत्ती प्रसिद्ध होण्याची कुठलीच शक्यता नाही.
तुमच्या संग्रहात या अंकाची प्रत जर नसेल, तर आजच 90040 34903 या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर ‘NAGNATA’ हा मेसेज पाठवा आणि ७५० + कुरियर किंवा पोस्टेज खर्च रुपये ७५ म्हणजेच एकूण ८२५ रुपये भरून अंकाची प्रतच नाही तर १०० रुपये किंमतीचं ‘चित्रसूत्र’ हे पुस्तक आणि ५०० रुपये किंम तीचा ‘गायतोंडे’ ग्रंथ ( जनआवृत्ती ) चक्क भेट मिळवा.
Related
Please login to join discussion