No products in the cart.
विक्रमी गायतोंडे !
प्रख्यात चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी 1972 साली रंगवलेलं एक तैलचित्र ‘सदबीज‘ न्यूयॉर्क यांच्या नुकत्याच न्यूयॉर्क येथे झालेल्या एका जागतिक लिलावात पुन्हा एकदा विक्रमी किंमतीत विकलं गेलं आहे. हे पेंटिंग 1973 साली दिल्लीच्या ‘गॅलरी चाणक्य‘मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर ते मुंबईच्या ताज आर्ट गॅलरीमध्ये देखील प्रदर्शित झालं होतं. नेहमीच्या पेंटिंग्जपेक्षा काहीशा छोट्या आकाराच्या म्हणजे 50×40 इंच आकाराच्या या पेंटिंगला सदबीजनं सुमारे 15 ते 20 लाख अमेरिकन डॉलर्स इतकी बेस प्राईज लावली होती. सरतेशेवटी हे पेंटिंग 24 लाख अमेरिकन डॉलर्स इतकी बोली लावली गेली. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 18,71,40,438 इतकी होते.
चित्रकार गायतोंडे यांचं प्रत्येकच चित्र आता लिलावांमध्ये विक्रमी किंमत मिळवू लागलं आहे यात शंकाच नाही. चित्रकार गायतोंडे यांनी आपल्या आयुष्यात इतर चित्रकारांच्या मानानं खूपच कमी पेनिंग्ज रंगवली. त्यामुळेच त्यांच्या चित्राला आता मोठी मागणी मिळू लागली आहे. प्रत्येक मोठ्या कलासंग्रहात गायतोंडे यांची चित्रं आता विसावू लागली आहेत. हे वाचल्यानंतर तुम्हाला जर गायतोंडे यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर ‘चिन्ह‘नं प्रकाशित केलेला ‘गायतोंडे‘ हा ग्रंथ अवश्य वाचा ! यात गायतोंडे यांची असंख्य चित्रं पाहायला मिळतीलच, पण गायतोंडे यांच्यासारखी शतकातूनच अपवादात्मक निर्माण होणारी व्यक्तिमत्व घडतात तरी कशी, हे देखील जाणून घेता येईल. ‘चिन्ह‘च्या 90040 34903 या व्हॉट्सअप नंबरवर ‘GAI’ हा मेसेज पाठवून तुम्ही या ग्रंथाविषयी अधिक माहिती मिळवून घेऊ शकता.
Related
Please login to join discussion