No products in the cart.
- Home
- Uncategorized
- ‘ए क्रिटिक्स व्ह्यू’ पुस्तकाचे प्रकाशन
‘ए क्रिटिक्स व्ह्यू’ पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ कला समीक्षक केशव मलिक यांनी 1965 ते 2013 दरम्यान विविध भारतीय चित्रकारांवर जे समीक्षात्मक लेख लिहिले ते आता पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहेत. AA पुस्तकाचे संपादन उषा मलिक यांनी केलं आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि 04 मे 2023 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष लेखक आणि संयोजक सिद्धार्थ टागोर आहेत तर कार्यक्रमाचा विषयप्रवेश संपादिका उषा मलिक करतील.
केशव मलिक हे नावाजलेले कला समीक्षक होते. त्यांनी हिंदुस्थान टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांसाठी नियमित कला समीक्षण केलं. 1973-74साली मलिक यांनी “द ह्यूमन कंडिशन” या प्रदर्शनाचं संयोजन केलं होतं. समकालीन भारतीय कलेचं हे प्रदर्शन बल्गेरिया, पोलंड, बेल्जियम आणि युगोस्लाव्हिया या देशात प्रदर्शित झालं होतं.
त्यांनी कधीही कला इतिहासाच्या दृष्टीकोनातून बोजड शब्दात कला समीक्षा केली नाही. तर कवी म्हणून सौदर्यशास्त्राची सखोल जाणीव त्यांना होती . त्या जाणिवेतून त्यांनी कला समीक्षा केली. समीक्षेत कठोर टीका करून कलाकारांना त्यांनी कधीच दुखावले नाही. कलाकृतीतील बलस्थानं आणि उणिवा ते नेहमीच हळुवार आणि नेमक्या शब्दात मांडायचे. त्यामुळे त्यांच्या कला समीक्षापर लेखांचा हा संग्रह कला अभ्यासक आणि समीक्षक या दोघांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
या कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून ज्येष्ठ कला समीक्षक प्रयाग शुक्ल सहभागी होतील. प्रयाग शुल्क हे संपादक, लेखक आणि कला समीक्षक आहेत. ज्येष्ठ चित्रकार स्वामिनाथन यांच्यावर त्यांनी चरित्रात्मक ग्रंथ लिहिला आहे. शुक्ल यांच्याबरोबर या कार्यक्रमात अल्काझी फौंडेशनच्या अमल अलाना वक्त्या म्हणून सहभागी होतील. त्याच बरोबर एमजीएमएच्या ज्योती टोकस, नरेन सेनगुप्ता, चित्रकार अर्पणा कौर, कालिचरण गुप्ता, सबा हसन चर्चेत सहभागी होतील. या चर्चेच्या सूत्रधार म्हणून ज्योती कथापालिया काम पाहतील.
या पुस्तकाचं प्रकाशन आर्ट अँड डील या मासिकाने केलं असून संस्था 25 व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी कार्यक्रमाची खालील पत्रिका पाहावी.
Related
Please login to join discussion