No products in the cart.
आंबेडकरी चित्रकला ?
आजच्या ‘सकाळ’मध्ये संपादकीय पानावर विशेष या सदरात डॉ. सुनील अभिमान अवचार यांचा एक विशेष लेख प्रसिद्ध झाला आहे. संपादकीय टिप्पणीमध्ये लेखाच्या शेवटी लेखक, चित्रकार, कवी असून मुंबई विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहे अशी माहिती देखील देण्यात आली आहे.
आजच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं ‘आंबेडकरी चित्रकारांचा बुद्धाविष्कार’ असं या लेखाचं शीर्षक आहे. लेखक म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांनी एका चित्रकारांकडून त्यांना अभिप्रेत असलेली बुद्धाची चित्र प्रतिमा तयार करून घेतली होती. त्यात बुध्द उघड्या डोळ्याचे आहेत. हे नुसते चित्र नव्हते, तर बुध्दांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन होता. हा उघड्या डोळ्यांचा बुद्ध म्हणजे आंबेडकरवादी दृश्यकलेचा उगम होय. हे डॉ. यशवंत मनोहर यांचे मत या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, मला चालणारा बुद्ध हवा आहे, असे म्हणणारे बाबासाहेब बुद्धाला बुद्धाच्याच ‘सब्बं अनिच्चंच्या, चरथ भिक्खवे’च्या संकल्पनेशी जोडून घेतात.
उघड्या डोळ्यांचा बुद्ध चितारून बाबासाहेब बुद्धालाच सम्यक दृष्टीचा आणि सम्यक ज्ञानाच्या मर्माशी जोडतात.
उघड्या डोळ्यांचा बुद्ध हे त्यांचे चित्र बावीस प्रतिज्ञा एवढेच विद्रोही आहे. भारतीय संविधानाला दिलेल्या प्रज्ञाना एवढेच सर्जनशील आहे. बाबासाहेबांनी जन्माला घातलेले हे बुद्धाचे एवढे डोळेच आंबेडकरी चित्र चळवळीचा उगम आहे. अशी विधानं करत करत डॉ. सुनील अभिमान अवचार हे चित्रकार प्रमोद रामटेके, श्रीधर अंभोरे, श्रावस्ती मोगलान, नंदकुमार जोगदंड, राजानंद सुरवडकर अशा अनेक चित्रकारांनी चितारलेल्या बुद्ध प्रतिमांवर भाष्य करतात. डॉ. अवचार यांनी अनेक महत्त्वाची विधानं या लेखात केली आहेत. एक वेगळा विचार म्हणून हा लेख अवश्य वाचायला हवा.
Related
Please login to join discussion