No products in the cart.
औरंगाबाद कॉलेज येथे कार्यशाळेचे आयोजन
दि १६ नोव्हेंबर रोजी शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबाद येथे Career opportunities in Animation industry या विषयावर उपयोजित कला विभागातील (तृतीय वर्ष) विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रा . निलेश उद्मले यांनी मार्गदर्शन केले. प्रा . निलेश उद्मले हे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय, औरंगाबादचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सहा वर्षे एमजीएम महाविद्यालय येथे ऍनिमेशन हा विषय शिकवला. सध्या ते Anibox Studio & Traning Institute चे Director आहेत.
या सेमिनारमध्ये ऍनिमेशन सॉफ्टवेअर, ऍनिमेशनचे प्रकार, इतिहास, इंडस्ट्रीबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता प्रा. रमेश सुभाष वडजे यांनी प्रा. निलेश उद्मले यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अश्विनकुमार जोगदंड यांनी सहकार्य केले.
*****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion