News

दिल्ली येथे अंजली बावसे यांचे चित्रप्रदर्शन

नागपूर येथील अंजली बावसे यांचे ‘मिस्ट्री’ हे चित्र प्रदर्शन १ ते ७ सप्टेंबर दरम्यान दिल्लीच्या ललित कला अकादमी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने त्यांच्या ऍबस्ट्रॅक्ट कलाकृतींचा समावेश आहे. अंजली बावसे यांनी नागपूर विद्यापीठातून कलेचे पदव्युत्तर शिक्षण (एम एफ ए ) घेतले असून, त्या नाट्य अभिनेत्रीही आहेत. मुंबई, नागपूर, दिल्ली येथे त्यांची चित्र प्रदर्शने झाली आहेत. भोपाळ येथे भारत भवनसोबतही त्यांनी काम केले आहे. उज्जैन येथील चित्र प्रदर्शनात त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. सध्या त्या गढी स्टुडिओ, दिल्ली येथे कार्यरत आहेत.
अंजली यांचे ‘मिस्ट्री’ हे चित्र प्रदर्शन सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत पाहता येईल.
प्रदर्शनाचा पत्ता:
गॅलरी नंबर ६,
ललित कला अकादमी
रवींद्र भवन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – ११०००१

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.