No products in the cart.
अर्थियन आर्ट फाउंडेशनचं आवाहन !
अर्थियन आर्ट फाउंडेशन ही संस्था मुरबाड येथील पळू गावात सुमारे तीन एकर जागेत कला केंद्र उभारत आहे. या कला केंद्रामध्ये कला आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून कलाकारांना वेगवेगळे प्रयोग करता येतील. विविध कलांचा अभ्यास करता येईल.
त्याचबरोबर अर्थियन आर्ट फाउंडेशनच्या संस्थापकांपैकी एक सदस्य प्रतीक जाधव या केंद्रामार्फत कला प्रवासात गोळा केलेल्या वेगवेगळ्या लोककला प्रकारांचे दस्ताऐवजीकरण सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे अर्थियन आर्ट फाउंडेशननं चित्रकार आणि रसिक यांना मदतीचं आवाहन केलं आहे. या सामाजिक कार्यासाठी कलावंतांना आपापल्या कलाकृती देखील येतील. या कलाकृतींच्या प्रदर्शन तसेच विक्रीमधून जो काही निधी जमा होईल तो कला केंद्र उभारणीसाठी वापरण्यात येईल. त्याचे रीतसर पत्र देखील देणगीदारांना देण्यात येईल.
कलाकृती देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. कोणत्याही माध्यमांत, कोणत्याही आकारात केलेल्या कलाकृती स्वीकारल्या जातील. प्रथमतः आपले नाव, आपल्या कलाकृतीचं फोटो, विषय, माध्यम, आकार खाली दिलेल्या नंबरवर किंवा ईमेलवर पाठवाव. त्यानंतर प्रत्यक्ष कलाकृती कोठे पाठवायची हे सांगितलं जाईल.
संपर्क : 8928682330, 7387369983
ई-मेल : earthianartfoundation@gmail.com
www.EarthianArtFoundation.com
Related
Please login to join discussion