No products in the cart.
मॉडेल आर्ट इन्स्टिट्युटचे ‘अर्क’ प्रदर्शन
मॉडेल आर्ट एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सर्टिफिकेट कोर्स इन व्हिजुअल कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम एप्रिल 2019 पासून सुरू करण्यात आला आहे. कलेचे अनेक विद्यार्थी या कोर्सच्या माध्यमातून डिझाईन क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण या अभ्यासक्रमातून घेतात. हा अभ्यासक्रम करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचे प्रदर्शन मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित करण्यात येते. यावर्षी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे ‘अर्क’ हे प्रदर्शन नेहरू सेंटर येथे दि ८ ते १३ मार्च २०२३ दरम्यान आयोजित केले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी अकरा ते सात वाजेपर्यंत आहे.
कला जगतामध्ये विविध स्तरांवर काम करताना उदयोन्मुख कलाकारांना बर्याच तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. या क्षेत्रात स्थिरस्थावर होण्याकरिता कलामाध्यमात कालानुरूप होणारे बदल कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. संस्थेने हेच उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवून या अभ्यासक्रमासाची मांडणी केली. कला जगतातील तज्ज्ञ, अनुभवी व्यावसायिकांकडून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. ‘अर्क’ हा अशा सर्जनशील, सकारात्मक वातावरणात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये घडलेला दृश्यसंवाद आहे.
***
Related
Please login to join discussion