No products in the cart.
चैतन्य दळवी यांना शिष्यवृत्ती…
चित्रकार चैतन्य दळवी यांना नुकत्याच झालेल्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीचे प्रायोजक आर्ट लाउंज आणि स्व. जयंत पंडित हे आहेत. निवडलेल्या कलाकाराला कला साहित्याच्या स्वरूपात ही शिष्यवृत्ती दिली जाते.
चैतन्य दळवी याने ठाणे स्कूल ऑफ आर्ट येथून आपले जीडी आर्टचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तो क्रिएटिव्ह पेंटिंग या विषयात एमएफए करत आहे. चैतन्य हा ड्राय पेस्टल, एक्रलिक या माध्यमात काम करतो. आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे देशभरातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज आणि कलाकृती पाठवण्याचे आवाहन केले जाते. यंदाच्या वर्षी देशभरातून सुमारे दोन हजार कलाकृतीमधून चैतन्य याची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनाचे उदघाटक म्हणून सिने दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी आणि अमीरखान यांची उपस्थिती होती.
****
Related
Please login to join discussion