FeaturesNews

हवीहवीशी ‘दादा’गिरी !

प्रा ( ? ) विश्वनाथ साबळे यांनी प्रा राजीव मिश्रा यांच्याकडे कला संचालकपदाचा पदभार सोपवताना अनुपस्थित राहून  आपल्या  बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शनच जणू कलाविश्वाला घडवलं . नागपूरहून कला संचालकपदाचा पदभार सोडण्याचा शासकीय आदेश घेऊन ते आले ते थेट म्हणे कार्यालयातच गेले.( ही कार्यतत्परता त्यांनी आपल्या कार्यकाळात दाखवली आता तर ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती अशी कुजबुज कँटीन परिसरात चालली होती म्हणे .) पदभार देण्यासंबंधीच्या कागदपत्रांवर सह्या करुन ते थेट घरी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी संचालनालयाकडे फिरकले देखील नाहीत . ते प्रा राजीव मिश्रा बिचारे तिकडे साबळे साहेबांची वाट बघत बसले . खूप वेळ वाट बघितल्यावर त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना असं कळलं की म्हणे कोरियन बिएनालेचा शेवटचा दिवस असल्यामुळे म्हणे साबळे साहेब कलाकृती उतरवण्यात , सर्व व्यवस्था लावण्यात व्यग्र असल्याने म्हणे पदभार देण्यास येऊ शकत नाहीत .पण मिश्रासाहेबाना त्रास होऊ नये म्हणून म्हणे त्यांनी  त्यासंदर्भातल्या सर्व कागदपत्रांवर त्यांनी आदल्या दिवशीच सह्या करुन ठेवल्यात वगैरे .

वास्तविक पाहता कुठल्याही कार्यालयात पदभार देण्या घेण्याचा एक अत्यंत अनौपचारिक प्रघात,रीती रिवाज असतो . विशेषतः सरकारी कार्यालयात तो कटाक्षाने पाळला जातो . तो त्या पदाचा मान देखील असतो. सहा महिन्यापूर्वी मिश्रा यांनी तो कसा पाळायचा असतो याचं छान दर्शन साबळे साहेबाना घडवलं होतं . परवाच्या बातमीत आम्ही जो फोटो वापरला होता तो त्याच कार्यक्रमाचा फोटो होता . मोठा पुष्पगुच्छ देऊन रीतसर मानानं फोटो वगैरे काढून मिश्रा यांनी पदभार साबळे यांच्याकडे सुपूर्द केला होता . पण साबळे याना मनाचा तो मोठेपणा काही दाखवता आला नाही . आपण किती कद्रू वृत्तीचे आहोत हेच त्यांनी या घटनेतून दाखवून दिलं .जे बिएनालेच कारण ते दाखवत आहेत ते तरी खरं होतं का ? ज्या बिएनालेला दिवसाला चार पाच प्रेक्षक देखील फिरकत नाहीत त्या बिएनालेचं असं काय काम साबळे याना होतं की फक्त पाच मिनिटासाठी सुद्धा दोन चार फर्लांगभर अंतरावर पदभार देण्यासाठी साबळे याना जाता येऊ नये ? साबळे साहेब काय भिंतीवरची पेंटींग उतरवत होते का ? पण ती उतरवायला तर शिपाई असतात की ! का त्यांचे जवळचे सहकारी देखील त्या दिवशी उपलब्ध नव्हते ? का बिएनालेच्या  खर्चाचे हिशेब करण्यात ते मग्न होते ? पण सरते शेवटी बिएनालेचे हिशेब सेटल करताना त्यांना मिश्रा साहेबांचीच मदत घ्यावी लागणार आहे , नाहीका ? मंत्रालयातल्या ज्या अधिकाऱ्याला ते रोज कार्यालयातून परत जाताना अगदी  घरापर्यंत लिफ्ट देत होते ते अधिकारीही आता साबळेंना भविष्यात  वाचवू शकणार नाहीत कारण दादांनी आता हे खातं ‘अंडर ऑबझर्व्हेशन ‘ ठेवलं आहे हे नक्की .   

****

Related Posts

1 of 148

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.