No products in the cart.
अभिजातमध्ये ब्रांकुसी !
कालच्या दैनिक लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत अभिजात या सदरात अरुंधती देवस्थळे यांनी ब्रांकुसी यांच्या शिल्पकलेवर अतिशय सुंदर असा लेख लिहिला आहे. त्यांच्या लेखात त्या लिहितात ‘कुठलीही गोष्ट निसर्गात आहे तशी दाखवली तर ते अनुकरण होईल, ती स्वतःची कलाकृती नसेल. स्वतःला त्यात नेमकं काय सुंदर दिसतं ते आणि तेवढंच कलाकारानं मांडावं.’ असा ब्रांकुसीचा ठाम दृष्टिकोन बनत गेला. निर्मितीच्या संदर्भात असं नेमक्या शब्दात आणि नेमकेपणानं ठामपणे विधान करणारी अशी असंख्य वाक्य या लेखात जागोजागी दिसतात जी कुणालाही नवा दृष्टिकोन देऊ शकतात. प्रत्येक कलावंतानं आणि कलानिर्मिती विषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्यानं हा लेख आवर्जून वाचायलाच हवा म्हणूनच ही नोंद !
https://epaper.loksatta.com/3482405/loksatta-mumbai/22-05-2022#page/20/2
Related
Please login to join discussion