No products in the cart.
सह्याद्रीच्या ‘रंगा येई वो’ मध्ये फिलीप डिमेलो
सह्याद्री वाहिनीवरील ‘रंगा येई वो’ या लोकप्रिय कार्यक्रमात चित्रकला क्षेत्रातील नामवंतांच्या रंगतदार मुलाखती प्रसारीत केल्या जातात. या मुलाखतीच्या २७ ऑगस्टच्या भागात वसई येथील चित्रकार फिलीप डिमोलो यांची मुलाखत प्रसिद्घ होणार आहे. मीना नाईक यांनी ही मुलाखत घेतली आहे. २७ ऑगस्ट शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार असून २८ ऑगस्ट दुपारी २ वाजता आणि रात्री ८.३० वाजता या कार्यक्रमाचे पुनःप्रसारण होणार आहे. त्याचबरोबर सह्याद्री वाहिनीच्या You Tube Channel वर आणि Facebook पेजवर देखील तुम्ही ही मुलाखत पाहू शकता.
फिलीप डिमेलो हे चित्रकलाक्षेत्रामध्ये ‘वसईवाला’ या नावाने ओळखले जातात. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या वसईजवळीस आगाशी हे त्यांचे मूळ गाव. आपल्या गावाश ऋणानुबंधांचे नाते असलेला हा चित्रकार जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून शिक्षण पूर्ण करून ते आपल्या पुन्हा आपल्या मुळ गावी स्थायिक झाले आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने गावाकडील निसर्ग,लोकजीवन, संस्कृती यांचे प्रतिबिंब दिसून येते.
Chinha Art News च्या यु-ट्युब चॅनलवर चिन्ह चे संपादक सतीश नाईक सर यांनी ‘गच्चीवरील गप्पा ‘ या कार्यक्रमात फिलीप डिमोलो यांची मुलाखत घेतली होती. पुढील लिंकवरून तुम्ही ती मुलाखत पाहू शकता. https://www.youtube.com/watch?v=TOb8kpI65ck
******
Related
Please login to join discussion