No products in the cart.
‘चित्रकार नंदलाल बोस आणि भारतीय संविधान’ : विशेष व्याख्यानांचे आयोजन
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचेच औचित्य साधून सर्जना निर्माण आणि विदर्भ साहि’त्य संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रकार नंदलाल बोस आणि भारतीय संविधान’ या विषयावरील विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये चित्रकार आणि कला इतिहास प्राध्यापक चंद्रकांत चन्ने, पल्लवी पंडीत आणि स्नेहल लिमये यांची व्याख्याने होणार आहेत. विदर्भ साहित्य संघाचे सांस्कृतिक संकुल, नागपूर येथे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होईल.
नंदलाल बोस यांना आधुनिक भारतीय चित्रकलेचे जनक मानले जाते. रवींद्र शैलीचे चित्रकार आणि कलाशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोस यांच्या २२ चित्रांचा समावेश भारतीय संविधानाच्या मूळ प्रतिमध्ये करण्यात आला आहे. संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला ८ बाय १३ इंचाची चित्रे साकारली आहेत. यामधून भारतीय इतिहास, कला, संस्कृती अविष्कृत झाली आहे. चित्र साकारताना ते देशी रंग, देशी कागद आणि देशी तंत्र यांचाच वापर करत असत.
Related
Please login to join discussion