No products in the cart.
गोवंडी आर्ट फेस्ट तर्फे आर्टिस्ट रेसिडन्सीची संधी!
ब्रिटिश कौन्सिलच्या मदतीने गोवंडी आर्ट फेस्टिवल तर्फे संदर्भित कला ( contextual art) विषयात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.
ब्रिटिश कौन्सिलच्या मदतीने गोवंडी आर्ट फेस्टिवल तर्फे संदर्भित कला ( contextual art) विषयात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये मुंबईस्थित आर्टिस्ट्स आणि गोवंडी येथील समुदाय ४ महिने एकत्रितपणे मिळून नियोजित स्थळी कलाकृतींची निर्मिती करतील. चार महिन्याच्या रेसिडन्सीसाठी एकूण ५ कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. या चार महिन्यात तयार झालेल्या कलाकृतींचे प्रदर्शन फेब्रुवारी २०२३ मध्ये होणाऱ्या गोवंडी आर्ट फेस्ट मध्ये करण्यात येईल.
या उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या कलाकारांनी लवकरात लवकर आपले प्रपोजल पाठवावे असे आवाहन गोवंडी आर्ट फेस्ट तर्फे करण्यात आले आहे. Crafts, Textile Art, Sound Art, Installation Art and Tech Art या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या कलाकारांकडून या उपक्रमासाठीची २४ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रपोजल्स मागवण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
Related
Please login to join discussion