News

‘गप्पां’मध्ये सुनील धोपावकर !

येत्या शनिवारी ‘गच्चीवरील गप्पां’चे निमंत्रित कलाकार आहेत नाशिकचे उपयोजित चित्रकार सुनील धोपावकर. मूळच्या जेजेच्याच सुनील धोपावकरांनी देवनागरी टायपोग्राफी या विषयावर प्रभुत्व मिळवलं आहे. १९७८ पासून ते या विषयावर काम करत आहेत. फेसबुकवर सतत ऍक्टिव्ह असलेल्या आणि नानाविध टायपोंचे नमुने सतत पोस्ट करणाऱ्या धोपावकरांनी आतापर्यंत आपल्या मराठी अक्षररचनांची ११ प्रदर्शनं भरवली आहेत.

१००० पेक्षा जास्त मराठी शब्द त्यांनी आतापर्यंत साकारले आहेत. ७० देवनागरी फॉंट्सची निर्मिती त्यांनी केली असून लवकरच संगणकाच्या कळफलकावर ते सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. मराठी टायपोग्राफीच्या प्रसारासाठी ते केवळ प्रदर्शनं भरवून थांबलेले नाहीत तर सतत कार्यशाळा आणि व्याख्यानं याद्वारे ते प्रसार करीत असतात. देवनागरी अक्षरसौंदर्याची गोडी समजावी म्हणून ७००० मराठी – हिंदी नावाचा टायपोग्राफिकल एन्साय्क्लोपीडिया देखील ते तयार करीत आहेत.

उपयोजित कलाकार असूनही एक वेगळी लाइफस्टाइल जगणाऱ्या या कलावंतांकडे सांगण्यासारखं खूप काही आहे आणि तेच त्यांना विचारणार आहेत ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक. येत्या शनिवारच्या संध्याकाळी ०५.३० वाजता ‘चिन्ह’च्या यु ट्यूब चॅनलवर आपल्याला हा लाईव्ह कार्यक्रम पाहावयास मिळेल. लिंक मिळवण्यासाठी कृपया 90040 34903 या व्हॉट्सअप नंबरवर ‘WG’ हा संदेश स्वतःच्या नामोल्लेखासह पाठवा.

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.