No products in the cart.
११ नोव्हेंबर पासून आर्टीव्हल प्रदर्शन
मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘आर्टिवल २०२२’ कला महोत्सवाचे आयोजन ११ ते १३ नोव्हेंबर २०२२ दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवाची वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ७ आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली व इतर भागातील सुमारे ३०० समकालीन व प्रथितयश कलाकारांच्या अंदाजे ३००० कलाकृती एकाच छताखाली बघता येतील. त्यात मुख्यतः चित्रे, शिल्पकृती, म्युरल्स, संकल्पशिल्पे, मांडणीशिल्पे वगैरेंचा समावेश आहे. तैलरंग, ऍक्रिलिक रंग, पेस्टल, पेन अँड इंक, मिक्स मिडीयम ह्या माध्यमातील चित्रे व संगमरवर, टेराकोटा, ब्रॉन्झ, मेटल, फायबर, वूड, स्टोन व मिक्स मिडीयामधील शिल्पकृती एकत्रितपणे सर्वांना बघण्याचा आनंद घेता येईल. कलाजगतातील प्रथितयश व नामवंत अशा ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहता येतील. टी वैकुंठम, सुहास रॉय, रमेश गोरजाला, लालूप्रसाद शॉ, सीमा कोहली यासारख्या मान्यवर प्रतिथयश कलाकारांसोबत बऱ्याचशा गुणवंत नवोदित कलाकारांची चित्रे व शिल्पाकृती मांडण्यात येणार आहेत.
या प्रदर्शनात सहभागी झालेली कला दालने :-
चित्रकथी आर्ट गॅलरी , द इंडियन गॅलरी, आय क्वेस्ट गॅलरी, ऊर्जा द आर्ट मुंबई, आकार – अ काँटेमपररी आर्ट, कोलकाता इत्यादी कला दालनांचा सामावेश आहे.
अधिकाधिक कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन आयोजक शरद गुरव यांनी केले आहे.
माहितीसाठी संपर्क : +91 99208 04573
महोत्सवाचा पत्ता :
वर्ल्ड ट्रेड सेंटर, एक्स्पो सेंटर, कफ परेड, मुंबई.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion