No products in the cart.
अरुण मोरघडे यांचे निधन
प्रसिद्ध वैदर्भीय चित्रकार अरुण मोरघडे यांचे सोमवार दि २६ सप्टेंबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. अनेक पुस्तकांसाठी त्यांनी कथाचित्रे, रेखाटने केली. आपल्या कुंचल्यातून त्यांनी आदिवासी जीवनशैलीवर भरपूर चित्रे काढली होती. अरुण मोरघडे यांचा जन्म नागपुरात झाला. त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला होता.
पुढे चित्रकलेचे शिक्षण घ्यायचे म्हणून ते मुंबईला आले. मुंबईत जेजे स्कुल ऑफ आर्ट येथे त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले होते. त्यांनतर त्यांनी आयुष्यभर नागपुरातच वास्तव्य केले. २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
चित्रकार अरुण मोरघडे यांना ‘चिन्ह आर्ट न्यूज’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
मोरघडे यांनी २०१२ मध्ये आपला एकमेव ब्लॉग लिहिला होता. त्या ब्लॉगवर त्यांची चित्रे प्रकशित केली होती. वरील चित्रे त्या ब्लॉगवरून साभार.
अरुण मोरघडे यांच्या ब्लॉगची लिंक:
http://memorghade.blogspot.com/2012/07/
****
चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n
‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch
Related
Please login to join discussion