No products in the cart.
आता चित्रकार विजय शिंदेदेखील पुस्तक रूपात
मूळचे सोलापूरचे पण नंतर चेन्नईमध्ये स्थायिक झालेले चित्रकार भगवान चव्हाण यांचं सध्या पुण्याच्या ‘ वेसावर आर्ट गॅलरी’त प्रदर्शन भरलं आहे. ५ नोव्हेंबर रोजी सुरु झालेलं हे प्रदर्शन ३ जानेवारीपर्यन्त चालणार आहे. त्या निमित्तानं सध्या भगवान चव्हाण पुण्यात आले आहेत. मध्ये दोन चार दिवस ते मुंबईतदेखील येऊन गेले. साहजिक भेट झालीच. काय चाललंय? विचारलं, तर म्हणाले विजय शिंदे याच्यावर पुस्तक करतोय. येत्या वर्षभरात ते प्रसिद्ध करायचा विचार आहे.
त्याविषयी खोदून खोदून विचारताच म्हणाले. ‘गेली तीनचार वर्षं हे काम मी करतोय. आता कुठंतरी ते पूर्णत्वाला जाईल असं मला वाटू लागलं आहे. हे काय मध्येच? असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते महत्वाचं होतं. ते म्हणाले. ” विजय शिंदे हा माझा शाळू मित्र. कुर्डुवाडीच्या शाळेत एकाच वर्गात आम्ही शिकलो. नंतर जेजेमध्येदेखील एकत्रच आलो. तो गेला अकरा-बारा वर्षांपूर्वी. त्याची पेंटिग्ज आता देशभरातल्या कलासंग्राहकांकडे आहेत, पण त्याच्यावर एकही पुस्तक मात्र प्रसिद्ध झालेलं नाही. आपले मराठी कलावंत या बाबतीत मागे पडतात. तुझ्यामुळे गायतोंडे यांच्यांवरचं पुस्तक आलं, तूच बरवे यांच्यावरदेखील काम करतो आहेस, मला वाटलं की त्याचा मित्र म्हणून किंवा शाळू सोबती म्हणून मीच ते काम का करू नये? आणि मी तीन चार वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात केली. आता ते पूर्ण होऊ घातलं आहे. वर्षा दोन वर्षात ते मराठी आणि इंग्रजीत प्रसिद्ध होईल. विजयच्या सर्वच मित्र-मैत्रिणींनी या पुस्तकात त्याच्याविषयी लिखाण केलं आहे.” ही माहिती खरोखरच नवी होती. म्हणूनच त्याची बातमी लगोलग देत आहोत.
आणखी तपशील लवकरच…
Related
Please login to join discussion