No products in the cart.
जेजे आणि भाभा !
मटाच्या विशेष प्रतिनिधीनं भाभा विद्यापीठासंदर्भात रविवारी दिलेली बातमी मोठी स्फोटकच ठरली यात शंकाच नाही. डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या स्थापनेला तीन वर्ष झाली तरी कुलगुरूंचीच नेमणूक झालेली नाही. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या चारही महाविद्यालयांमध्येअसलेली रिक्त पदं अद्यापही रिक्त आहेत, अशी माहिती त्या बातमीत अगदी सविस्तर देण्यात आली होती.
त्या बातमीनं कला वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. जेजे स्कूल ऑफ आर्टच्या डिनोव्हो आंदोलनात सहभागी झालेल्यांनी विरुद्ध गटातील म्हणजे राज्यस्तरीय विद्यापीठ हवं असलेल्याना हा मेसेज अगदी आवर्जून पाठवला. आपापल्या व्हाट्सअप ग्रुपवर देखील संबंधितांना खिजवता येईल अशा पद्धतीनं तो शेअर देखील केला. पण ग्रुपवर सुरुवातीला कुणालाच काही समजलं नाही. ‘चित्रकलेच्या ग्रुपवर ही बातमी कशाला ?’ अशी विचारणा झाली, तेव्हा कुठे खुलासा झाला, पण नंतर मग मात्र ग्रुपवर शांतताच पसरली. कारण जेजे मध्ये डिनोव्हो हवं असलेल्यांनी ‘तुमच्या नव्या युनिव्हर्सिटीची देखील अशीच अवस्था उद्या झाली, तर काय कराल ?’ असा झणझणीत प्रश्न विचारला आणि राज्यस्तरीय विद्यापीठवाल्याना निरुत्तर करून टाकलं.
Related
Please login to join discussion